Wednesday, February 1, 2023

मुंबई BMW कारला अपघात, ६ महिण्याच्या चिमुकलीसह तीघांचा मृत्यू

- Advertisement -

मुंबई प्रतिनिधी | खान अब्दुल गफार खान रस्त्यावर बी.एम.डब्ल्यू. कारला अपघात झाला. अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये सहा महिण्यांच्या चिमुकलीचाही समावेश असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मुंबईतील खान अब्दुल गफार खान रस्त्यावर शनिवारी रात्री बी.एम.डब्ल्यू. कारला अपघात झाला. गाडीवरचे नियंत्रन सुटल्याने बीएमडब्ल्यू गाडी दुभाजकाला धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये दोन महिला तर एका सहा मिहिण्याच्या चिमुकलीचा समावेश आहे.

दरम्यान ड्राइविंग करणारी महिला गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरु आहेत अशी माहिती पोलिस प्रशासनाने दिली आहे. तसेच अपघाताचे आणखी काही कारण आहे काय याचा तपास आम्ही करत आहोत असेही पोलिसांकडून सांगण्यात आले.