थर्ड अँगल | सीमंतिनी घोष
‘बॉईज लॉकर रूम’ च्या घटनेनंतर मी प्रचंड मनस्ताप आणि भीतीमध्ये तुम्हाला हे सगळं लिहिते आहे. एका सहा वर्षाच्या मुलाची आई म्हणून मला भीती वाटत आहे. लैंगिकतेची पर्वा न करणाऱ्या मुलांची मला भीती वाटते आहे. जर आपण आताच काही कृती नाही केली तर काही वर्षानंतर माझा मुलगा, आपल्यापैकी कुणाचाही मुलगा/मुलींकडे घाणेरड्या पद्धतीने पाहणाऱ्या एखाद्या समूहाचा भाग होईल, याची मला भीती आहे. शिक्षक आणि पालकांनी दोन खोल अशा त्रासदायक सत्यासाठी जागे झाले पाहिजे. एक म्हणजे सायबर धमक्या ज्या मानसिक ताण, अस्वस्थता अति तणाव यासाठी कारणीभूत असतात. जे तणाव वास्तविक जीवनातील धकाधकीच्या घटनांसारखेच असतात. ‘बॉईज लॉकर रूम’ सारख्या घटनांमध्ये सायबर धमक्या महिलांच्या विरोधातील हिंसेसाठी दिल्या जातात. दुर्दैवाने भारतात हे खूप सामान्य आहे. महिलांना स्वतःला संपूर्णपणे झाकून घ्यायला सांगणे आणि त्यांना घरांमध्ये अदृश्य करण्यात भारताने उत्कृष्ट काम केले आहे. आपण नित्याने लाजेने हिंसेतही तग धरून राहतो आणि गुन्हेगार मोकळेपणाने फिरत असतात. महिलांचे ‘चांगल्या महिला’, ज्या त्यांच्यावरील विश्वासाच्या मर्यादा तोडत नाहीत आणि ‘वाईट महिला’ ज्या त्यांच्याविरूद्ध हिंसा करणाऱ्यांच्या विरोधात कायदेशीररित्या शिक्षा देतात असे विभाजन केले जाते. याचे देखील प्रतिबिंब सायबर क्षेत्रात दिसून येते. स्पष्ट बोलणाऱ्या महिला या नेहमी ऑनलाईन लैंगिक धमक्या देण्यासाठीचा निशाणा असतात. अनेक महिला त्यांच्यावर झालेल्या ऑनलाईन लैंगिक अत्याचाराच्या वैयक्तिक अनुभवांची साक्ष देऊ शकतात. काही वेळा तर अनुक्रमे होय. अपराधींनी वारंवार अपराध करूनही पीडितांना मात्र नेहमी समुदायापासून दूर करून घेण्याचा पर्याय ठेवला जातो. अनेक महिलांवर अत्याचार केल्यानंतरही गुन्हेगार त्यासाठी क्वचितच जबाबदार ठरतात. त्याऐवजी जे महिलांच्या बलात्कार, त्यांच्यावरील विनोद आणि त्यांना दिल्या जाणाऱ्या धमक्या यांना निरुपद्रवी मजा मानणारा परोपकारी समाज त्यांना या गोष्टी करण्यास आणखी सक्षम बनवतो.
‘बॉईज लॉकर रूम’ घटनेने एक महत्वाचा धडा अधोरेखित केला आहे. आपल्याला लवकरात लवकर शाळा आणि धोरणकर्त्यांना हलवून आपल्या मुलांना लैंगिक शिक्षण मिळते आहे का याची खात्री करून घेतली पाहिजे आणि त्यादृष्टीने कृती केली पाहिजे.
सीमंतिनी घोष
जोपर्यंत एखाद्याला प्रत्यक्ष अनुभव येत नाही तोपर्यंत त्यांना या आभासी अत्याचारामुळे झालेले अथक नुकसान समजणे कठीण आहे. ज्या स्त्रियांनी धार्मिक/ राष्ट्रीय कायद्यांचा त्रास झाल्याचे उघडपणे सांगितले आहे, त्यांना लिंचिंग, बलात्कार आणि मृत्यूसारख्या अनेक धमक्यांना सतत सामोरे जावे लागते. ज्या विवेकी महिला आपले मत व्यक्त करण्याचे धाडस करतात, अशा महिलांसोबत विकृती आणि हिंसाचार केला पाहिजे यासाठी ट्रोलर्स नेहमी नाविन्यपूर्ण मार्गांचा विचार करत असतात. मोठ्या संख्येने सोशल मीडियावरील भारतीयांनी ते स्वीकारले आहे आणि त्या ढोंगात राहायलाही शिकले आहेत. मोठ्या प्रमाणात माध्यमांनी या गोष्टींवर प्रकाश पाडूनही गुन्हेगारांविरुद्ध प्रत्यक्ष कारवाई खूप कमी प्रमाणात केली जाते. अडचणीतून मुक्त होण्याची आणि प्रसंगाला सामोरे जाण्याची जबाबदारी महिलांवरच असते. असे इंटरनेट ट्रोल्स सारखे प्रकार हे शहरातील उत्तम शाळेत शिकणाऱ्या सुशिक्षित मुलांकडून अपेक्षित नसल्याच्या कारणामुळे समाजात आक्रोश आहे. हा तार्किक समज आहे. जो कदाचित काहीच विचारला जाणार नाही. किशोरवयीन मुलांच्या इच्छेच्या प्रदर्शनासारख्या वागणुकीपासून दूर राहण्यासाठी काही प्रयत्न देखील केले जातात. १९६० च्या दशकापासून समाज जीवशास्त्र फॅशनेबल झाले असल्याने, मोठया प्रमाणात जीवशास्त्रीय निर्धारांद्वारे हिंसक वागणूक स्पष्ट करणारे संशोधन करण्यात आले आहे. वृषणात तयार होणारे, लैंगिक वैशिष्ट्यांचे वाढ करणारे संप्रेरक, योद्धा जनुक (gene), टेस्टोस्टेरॉन, सुपरमेल (ज्यात एक गुणसूत्र आणि autosomes चे तीन संच असतात) या सर्वांकडे माध्यमांचे लक्ष होते आणि नंतर अधिक काळजीपूर्वक, नियंत्रित संशोधनाद्वारे अंशतः किंवा पूर्णतः हे सर्व स्वीकृत करण्यात आले. पण लोकप्रिय जाणिवेनुसार टेस्टोस्टेरॉन हे पुरुषी आक्रमकतेचे कारण मानले जाते. विशेषतः जर त्यामुळे लैंगिकतेला उत्तेजन दिले गेले असेल तर तेच कारण मानले जाते. काही दंतकथा शोधून त्यांना वास्तविक पुराव्यांसहित तोलल्यानंतरचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे आहे.
१) पहिले चांगल्या घरातील सुशिक्षित मुले महिलांना त्रास देत नाहीत.
स्पष्टीकरण – आतापर्यंत त्या समूहाशी जोडली गेलेली सर्व मुले ही दिल्ली एनसीआर, नोएडा येथील चार किंवा पाच खास लोकांच्या शाळेतील तसेच अगदी हेतुपूर्वक सुशिक्षित आणि सामाजिकदृष्ट्या उत्तम घरातील होती. याउलट पुराव्यांमधील एक मोठा भाग भारतीय सामाजिक संरचनेत शक्तीची पात्रता आणि दंडात्मक कारवाई प्रदान करणाऱ्या काही विशेष अधिकारांना सूचित करतो. लैंगिक अत्याचाराला ज्या निर्लज्जपणाने हाताळले जाते त्या सगळ्याचा हा परिणाम आहे.
२) दुसरे, मुले ही मुले असतात. किंवा याचा दोष टेस्टोस्टेरॉनला दिला जातो.
स्पष्टीकरण – होय, टेस्टोस्टेरॉनचा संबंध पुरुषी आक्रमकतेशी जोडला जातो. पुरुषी आक्रमकता हे चिंपांझी सारख्या सर्वश्रेष्ठ समुदायाचे सर्वात खास लक्षण आहे. जे आपले अगदी नजीकचे पूर्वज आहेत. ज्यांच्यातील पुरुषांचे सामाजिक संवाद हे स्त्रियांच्या विरोधातील हिंसाचारामुळे आणि अल्फा वर्चस्वामुळे चर्चेत असतात. तथपि अनुवांशिकतेच्या संदर्भात बोलायचे तर आपण आणखी एका समुहासारखे आहोत, ज्यांना bonobos म्हणतात तर ते स्त्रीवादी आणि समतावादी आहेत. म्हणजे, मानवी नरांमध्ये असणारी कठोर हिंसा ही कल्पना सदोष आहे. वागणूक ही पर्यावरणीय आणि जीवशास्त्रीय संवादाद्वारे निश्चित केली जाते. जेव्हा आपण सामाजिक वागणुकीवर येतो तेव्हा १२,००० वर्षांपासूनच्या सांस्कृतिक आणि संज्ञात्मक उत्क्रांतीचा हिशोब घ्यावा लागतो. स्क्रीनशॉटमध्ये असणाऱ्या पुराव्यांमध्ये दिसणारी केवळ पौगंडावस्था निष्ठुरता स्प्ष्ट करत नाही. उच्च वर्गीय बलात्कार प्रकरणे किंवा भारतीय महिलांच्या विरोधातील हिंसक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी या पौगंडावस्थेतील मुलांना माध्यम कव्हरेज पासून दूर ठेवले जाऊ शकत नाही. जेव्हा संवाद लैंगिकता आणि संमतीच्या भोवती असतो तेव्हा ही मुले लैंगिक हिंसेबद्दल खूप सहजरित्या बोलत असतात तसेच अत्यंत उग्र विशेषतः महिलांचा द्वेष करणारे विचार व्यक्त करत असतात. हे सुद्धा खूप चिंताजनक आहे.
३) तिसरे, थोडीशी निरुपद्रवी मजा करण्यात काय समस्या आहे?
स्पष्टीकरण – चुकीचा प्रश्न. इथे आणखी काही चांगले प्रश्न आहेत. मजेसाठी पाशवी हिंसा कशी काय केली जाते, आणि ती निरुपद्रवी कशी असू शकते? कुणीतरी ज्या महिलांची छायाचित्रे वापरली गेली, त्यांना झालेल्या आघातापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला? महिलांच्या शरीरावरचे हे अधिकार कुठून आले? जे काय आहे जे इतक्या निखालसपणे आणि रानटी वृत्तीने संमतीकडे दुर्लक्ष करण्यास शिकवते? एखादी व्यक्ती आपल्याच मैत्रिणीसोबत पाशवी हिंसा करण्याची कल्पना कशी काय करू शकते आणि त्यातून आनंद कसा मिळवू शकते? आपण महिलांविरोधातील हिंसा इथपर्यंत सामान्य केली आहे का की ‘बॉईज लॉकर रूम’ सारख्या समुहापासून अपेक्षित असणाऱ्या स्वीकार्य चर्चेत महिलांवर सामूहिक बलात्काराचे करण्याचे नियोजन करतो? अशा पद्धतीने आपण बंधुत्व वाढविणार आहोत? आचारपद्धती सुधारणार आहोत? पालक म्हणून, आपण या विषारी पुरुषत्वाला आपण कसे रोखणार आहोत, ज्यामुळे आपल्या मुलींचे कधीच भरून न येणारे नुकसान होते आहे? आपण यात समाविष्ट असणाऱ्या मुलांना सहजपणे विकृत म्हणून चिन्हांकित करु शकत नाही, त्यांना शिक्षेसाठी पात्र म्हणून पुढे जाऊ शकत नाही. भारतातील प्रत्येक मोठ्या बलात्काराच्या प्रकरणानंतर बलात्काऱ्यांना फासावर लटकवण्याची ओरड समाजातून केली जाते. आणि त्यांना फासावर लटकवले ही आहे. बलात्कार करणारे नराधम, पोलीस एन्काऊंटरमध्ये मारलेही गेले आहेत. तरीही आतापर्यंतची आकडेवारी सातत्याने सांगते की, मृत्यूची शिक्षा देऊनही कुठेही, कधीही आपण महिलांविरुद्धच्या हिंसा कमी करू शकलो नाही आहोत. भारताने बलात्कार/ सामूहिक बलात्काराच्या प्रकरणात मृत्युदंडाची परवानगी दिली असल्याने त्यांना खालच्या कोर्टात असेच सोडून दिले जाते. तथापि, इतर बलात्काऱ्यांना फाशी देऊन समस्या संपत नाही. याचे ही अलीकडची घटना म्हणजे आणखी एक प्रात्यक्षिक आहे. कारण बलात्कार आपल्या आत राहतो. आपला समाज बलात्काराच्या संस्कृतीला सक्षम करतो, परवानगी देतो आणि त्याची निष्क्रिय शांतता बलात्काराला बळकट करते. ही पुढची आणि पूर्णतः बलात्काराची संस्कृती आहे.
दोन दृष्टिकोन तात्काळ गरजेचे आहेत. लिंगभाव आणि लैंगिक शिक्षणाला प्राथमिक शाळेच्या अभ्यासक्रमाचा भाग बनविले पाहिजे. शाळांनी तात्काळ पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांसोबत नियमित सायबर धमक्या, लिंगभाव संवेदनशीलता आणि लैंगिक अत्याचारासंदर्भातील कार्यशाळा घेतल्या पाहिजेत. मी विशेषतः पालकांना विनंती करते की त्यांनी त्यांच्या मुलांमधील हक्काची भावना जी प्रत्येक भारतीय पुरुषामध्ये असते ती नष्ट करून टाका. आपल्या मुलींना अंगभर कपडे घाला किंवा घरात राहा हे सांगण्यापेक्षा आपल्या मुलांना बलात्कार करू नका म्हणून सांगा. आपण मुलांना संमतीचा अर्थ शिकविला पाहिजे. जर पालक स्वतः उदाहरण झाले नाहीत तर वरील सर्व चुकू शकते. मोठ्या प्रमाणात भारतीय तरुण हे लिंगभाव समानता बघत वाढलेले नाहीत त्याऐवजी त्यांनी उलटेच बघितले आहे. मुले आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी बघत असतात त्यातूनच ते शिकत असतात. जर मुलांमध्ये लिंगभावाबद्दल आदर वाढवायचा असेल तर लैंगिक रूढी तोडणे फार महत्वाचे आहे. रूढीवाद प्रामुख्याने कुटुंबामध्ये हैरारकी निर्माण करतो, जिथे एका लिंगाची स्थिती दुसऱ्याची स्थिती ठरविते.
एक विद्यापीठ शिक्षक, नागरिक आणि पालक म्हणून माझी एक प्रामाणिक आशा आहे की आपण या सामूहिक अपयशामध्ये बरोबरीची भागीदारी घेऊ. आपण आता धोरणकर्ते आणि शाळामधून मुलांना लवकर लैंगिक शिक्षण मिळते आहे का याची खात्री केली पाहिजे. जोपर्यंत आपण आपल्या आजूबाजूला असणाऱ्या भरभराटीच्या बलात्कार संस्कृतीची जबाबदारी घेणार नाही, तोपर्यंत भारतीय महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षितता खूप लांबची गोष्ट आहे.
लेखिका अशोका विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक आहेत. मूळ इंग्रजी लेखाचा अनुवाद जयश्री देसाई यांनी केला आहे. प्रतिक्रियांसाठी संपर्क – 9561190500