Mumbai : अजय देवगणच्या मुलीचे 31 डिसेंबरचे फोटो व्हायरल; मित्रांसोबत रात्री पबमध्ये…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलिवूडमधील प्रसिद्ध विनोदी, ऍक्शन भूमिका साकारणाऱ्या अभिनेता अजय देवगण व पत्नी काजोल हि जोडी नेहमी काही ना काही कारणांनी चर्चेत असते. ते सध्या त्यांच्या मुलीच्या 31 डिसेंबरच्या पार्टीमुळे पुन्हा चर्चेत आले आहेत. नुकत्याच झालेल्या 31 डिसेंबरच्या पार्टीत त्यांची मुलगी निसा आपल्या मित्रांसोबत सहभागी झाली होती. तिचे पार्टीतील ब्लॅक डिपनेक शॉर्ट ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

Hello Krushi Mobile App

काजोल आणि अजय देवगणने बॉलिवूडमधील अनेक सुपरहिट चित्रपट केलेले आहेत. त्याच्या दमदार अभिनयामुळे प्रेक्षक आजही त्यांचे येणारे चित्रपट आवडीने पाहतात. शिवाय आजच्या जमान्यात काजोलपेक्षा अजय देवगण सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह असतो. त्याच्याकडून अनेक प्रकारच्या पोस्टही केल्या जातात. त्याची लाडकी लेक असलेल्या निसा हिच्या बाबतीत काही दिवसापूर्वी ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा सुरु होती. त्यानंतर ती प्रसिद्धीच्या झोतात आली होती. मात्र, आता ती पुन्हा एका कारणाने प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. तिने नुकत्याच 31 डिसेंबरच्या पार्टीत सहभाग घेतला होता.

https://www.instagram.com/p/Cm6pLTzIwKe/?igshid=OGQ2MjdiOTE=

या पार्टीत निसाने हॉट लुकचा ड्रेस घालत रात्रीच्यावेळी पबमध्ये चांगलाच एन्जोय केला. यावेळी तिचे मित्रासोबतचे हॉट पोजचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. तिच्या ऐन तारुण्यातील फोटोमुळे ती आता बॉलिवूडमध्ये यायला तयार झाली असल्याचे दिसून येते.

nyasa

पार्टीतील फोटोंमध्ये न्यासासोबत ‘ती’ व्यक्ती कोण?

अजय आणि काजोलची मोठी लेक न्यासा हि एका पार्टीत सहभागी होत बेधुंद वावरताना दिसली. तिने या पार्टीत चांगलाच एन्जॉय केला हे तिच्या व्हायरल झालेल्या पार्टीतील फोटोवरून दिसते. मात्र ती ज्या व्यक्तीसोबत अगदी जवळून फोटो काढत होती ती व्यक्ती नेमकी कोण असा प्रश्न अनेकांना पडला असेल तर ती व्यक्ती निसाचा खास मित्र ओरहान अवत्रामणी आहे.

nisa

कोण आहे ओरहान अवत्रामणी?

काजल आणि अजयच्या लेकीसोबत पार्टीत एन्जॉय करणारा व्यक्ती ओरहान अवत्रामणी हा एक सामाजिक कार्यकर्ता आहे. त्याची अनेक स्टारकिडसोबत मैत्री आहे. तो नुकताच एका पार्टीत श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूरसोबत एका पार्टीत हातात हात घालून चालताना दिसून आला.