Wednesday, February 1, 2023

‘रुके ना तू…..’; म्हणत, कोरोनाच्या काळात बॉलिवूडच्या महानायकाने लोकांना केले खंबीर राहण्याचे आवाहन

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसच्या रुग्णांची प्रचंड वाढ होत आहे. यामुळे आतापर्यंत अनेकांनी आपले जीव गमावले आहेत. वाढत्या रुग्णांसमोर मात्र वैद्यकीय यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडली आहे. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर तर रुग्णालयात बेड्सचा तुटवडा निर्माण झाला आहे.यामुळे लोक हताश व हवालदिल झाले आहेत. या कठीण काळात लोकांना धैर्य देण्याकरिता बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन पुढे सरसावले आहेत. अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडिओत त्यांनी रुके ना तू.. या कवितेचे प्रकटीकरण केले आहे.

- Advertisement -

या व्हिडीओतील रुके ना तू.. हि कविता प्रसिद्ध लेखक, कवी प्रसून जोशी यांची आहे. या आधीही अमिताभ बच्चन यांनी प्रसून जोशींच्या अनेक कवितांचे प्रकटीकरण केले आहे. मात्र रुके ना तू…. हि प्रेरणादायी कविता सादर करत त्यांनी लोकांना या कोरोना नामक संकटासमोर हार मानू नका असे सांगितले आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी लिहिले की, रुके ना तू, एकत्रित येऊन आपण लढू आणि जिंकू. यापूर्वीही अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत होप म्हणजेच आशेवर एक कविता ऐकवली आहे. जी या संकटात लोकांना एकत्रित येण्यासाठी प्रेरीत करते.

काही दिवसांपूर्वी अमिताभ बच्चन यांनी दिल्लीत कोविड सेंटर उभारणीसाठी आर्थिक मदत केली. त्यानंतर आता ते लोकांना या संकटात एकत्र येण्याचे आवाहन करताना दिसत आहेत. अमिताभ बच्चन यांनी दिल्लीतील रकाब गंज गुरुद्वारामध्ये कोविड केअर सेंटर बनवण्यासाठी दोन कोटी रुपयांची मदत केली आहे. ३०० बेड्स असलेल्या या कोविड सेंटरचं नावं ‘श्री गुरु तेग बहादुर कोविड केअर फॅसिलिटी’ असे आहे. या मदतीविषयीची माहिती खुद्द दिल्ली शीख गुरुद्वारा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष मंजींदर सिंग यांनी दिली होती. या कोविड केअर फॅसिलिटीमध्ये कोरोनाबाधित रुग्णांसाठी डॉक्टर, पॅरामेडिक्स यांच्यासह अॅम्ब्युलन्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स इत्यादी सुविधांची व्यवस्था असणार आहे.