Thursday, March 30, 2023

बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालचा पाय झाला फ्रॅक्चर; व्हिडीओ झाला वायरल

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेता अर्जुन रामपाल याला गंभीर दुखापत झाले असल्याचे समोर येत आहे. एका वायरल व्हिडिओच्या माध्यमातून अर्जुनची झालेली अवस्था समोर आली आहे. हा व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना आणि अन्य नेटकर्यांना त्याला हि दुखापत कशी झाली असा प्रश्न पडला आहे. त्याचे चाहते तर चांगलेच चिंतेत पडले आहेत. अभिनेता अर्जुन रामपालला नुकतेच त्याच्या घराच्या बाहेर पाहण्यात आले आहे. या दरम्यानचाच हा व्हिडीओ असून त्यावेळी काठीचा आधार घेऊन तो चालत असल्याचे दिसले. त्याच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर झाल्याचे यात दिसत आहे.

https://www.instagram.com/p/CPTEeiMg5xG/?utm_source=ig_web_copy_link

- Advertisement -

अभिनेता अर्जुन रामपालचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल झाला आहे. या व्हिडिओत अर्जुन त्याच्या कारमधून उतरल्यानंतर एका काठीचा आधार घेऊन हळूहळू चालत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओत अर्जुनने पांढरे टी शर्ट, ग्रे शॉट्स आणि काळ्या रंगाचे श्रग परिधान केल्याचे दिसत आहे. हा व्हिडिओ सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी याने आपल्या ऑफिशियल इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना एकच प्रश्न पडतोय कि अर्जुनला इतकी गंभीर दुखापत कश्याने झाली असेल. मात्र अद्याप याविषयी काहीही समजलेले नाही.

https://www.instagram.com/p/CN9kLGGFnLb/?utm_source=ig_web_copy_link

हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने वायरल होतो आहे. अर्जुन रामपालची ही अशी अवस्था पाहून त्याचे चाहते अत्यंत काळजीत पडले आहेत. इतकेच नव्हे तर हे सारे सोशल मीडियावरून अर्जुनच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत आणि अर्जुनने त्याची काळजी घ्यावी असे सांगत आहेत. अभिनेता अर्जुन रामपालने नुकताच कोरोना विषाणू विरूद्ध लढा जिंकला आहे. त्याने स्वतःहून सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत याविषयी आपल्या चाहत्यांना सांगितले होते. मात्र यावेळी अजूनही अर्जुनने झालेल्या दुखापतीबाबत काहीच वक्तव्य केलेले नाही. त्यामुळे अर्जुनला कशामुळे दुखापत झाली हे अद्याप तरी कळू शकलेले नाही.