Saturday, March 25, 2023

शाहरुखच्या ‘गुडबाय फ्रेडी’ला कार्तिक आर्यनचा राम राम; साइनिंग अमाऊंटही केली परत

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचे चालू दिवस पाहता असं वाटतंय त्याचं नशीब कुठंतरी पाणी पिऊ लागलाय. सध्या इंडस्ट्रीमधले त्याचे चित्रपट सोडण्याचे सिलसिले काही संपतच नाहीत. काही दिवसांपूर्वी करण जोहरने आपल्या ‘दोस्ताना २’ या आगामी चित्रपटातून त्याला बाहेरचा रास्ता दाखवला होता. या कट्टीनंतर त्याच शाहरुखसोबत जरा बरं सुरु होत, तोच आता त्यानेही आपल्या आगामी सिनेमातून कार्तिकला बाहेरचा रस्ता दाखवल्याचे कळतेय. असं म्हटले जात आहे कि, काही रचनात्मक मतभेदांमुळे कार्तिकनेच हा सिनेमा सोडला आहे.

- Advertisement -

ई-टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शाहरूख खानच्या होम प्रॉडक्शनचा ‘गुडबाय फ्रेडी’ नामक एक सिनेमा कार्तिकने नुकताच साईन केला होता. या सिनेमाचे साइनिंग अमाऊंटही कार्तिकने घेतले होते. पुढे सगळे काही सुरळीत सुरू होते. मात्र इतक्यातच त्याचे प्रोडक्शनसोबत मतभेद झाले आणि या मतभेदांमुळे कार्तिकने थेट दुसरा सिनेमा सोडला. इतकेच नव्हे तर त्याने साइनिंग अमाऊंटही परत केल्याचे समजत आहे. तसे पाहता अद्याप या सिनेमाची घोषणा अधिकृतरित्या झाली नव्हती. पण यावर्षी त्याचे शूटींग मात्र सुरू होणार होते.

https://www.instagram.com/p/CPU5atYNeBu/?utm_source=ig_web_copy_link

अजय बहल दिग्दर्शित हा सिनेमा शाहरूख खान याच्या ‘रेड चिलीज प्रॉडक्शन’ अंतर्गत बनणार आहे. या सिनेमात कार्तिकसोबत अभिनेत्री कॅटरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार होती. पण आता कार्तिकची एक्सिट झाल्यावर त्याच्या जागी कोण दिसेल याबाबत काहीच कल्पना नाही. कार्तिक आर्यन सध्या ‘भुलभुलय्या २’ या चित्रपटात झळकणार आहे. यात तो कियारा अडवाणीसोबत दिसणार आहे. शिवाय रोहित शेट्टीच्या एका सिनेमातही कार्तिकची वर्णी लागली आहे, अशी माहिती मिळत आहे.

https://www.instagram.com/p/CL2KkZspbIv/?utm_source=ig_web_copy_link

कार्तिक आर्यनला बॉलिवूड मध्ये येऊन काही फारसा काळ झालेला नाही. मात्र अनेक चित्रपटांतून त्याने अव्वल भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात आपली अशी हक्काची जागा बनविली आहे. प्यार का पंचनामा, आकाशवाणी, गेस्ट इन लंडन, सोनू के टिटू कि स्वीटी, लुका छुपी, पती- पत्नी और वोह, लव्ह आजकल अश्या अनेक चित्रपटांमध्ये कार्तिक झळकला आहे. हे चित्रपट पाहिल्यानंतर कार्तिक बॉलिवूड जगतातील चलती गाडी आहे असे म्हणायला काही हरकत नव्हती. मात्र आजकाल त्याच्या चित्रपट सोडण्याच्या बातम्यांनंतर त्याने लवकर सावरणे गरजेचे आहे असे दिसत आहे. नाहीतर निश्चितच त्याच्या अभिनय क्षेत्रातील कारकीर्दीस ग्रहण लागण्याची शक्यता आहे.