कुणाचे दुःख पाहायला डोळ्यांची गरज लागत नाही; सोनू सूदला भेटली जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूने कहर केला आहे. अश्या काळात गरजूंच्या मदतीसाठी अनेकजण स्वतःहून पुढाकार घेताना दिसत आहेत. गतवर्षापासून कोरोना काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गरजू लोकांची जमेल तितकी मदत करतोय. दिवसरात्र तो देशातील अनेको लोकांसाठी खपतोय. अशावेळी सोनूला एक अशी व्यक्ती भेटली आहे, जिच्यामुळे त्याला हे कार्य करताना आणखीच प्रेरणा मिळतेय. हि व्यक्ती अशी तशी नाही तर जगातील सर्वात श्रीमंत भारतीय आहे, असे सोनू म्हणतोय. तर बोड्डू नागा लक्ष्मी नाव असलेल्या एका अंध व बेताची परिस्थिती असणाऱ्या मुलीने सूद फाऊंडेशनला आर्थिक साहाय्य केले आहे. तिच्या ह्या मदतीमूळे सोनूचा ऊर अभिमानाने भरून आला आहे.

आंध्रप्रदेशच्या एका छोट्याशा गावातील बोड्डू नागा लक्ष्मी. ही एक युट्यूबर आहे. या लक्ष्मीने सोनूच्या सूद फाऊंडेशनला १५००० रूपयांचे आर्थिक साहाय्य केले आहे. हे १५०००/- रुपये लक्ष्मीचे पाच महिन्यांचे पेन्शन आहे. आता इतके सगळे ऐकल्यावर ती श्रीमंत कशी? असा प्रश्न कुणालाही पडणे अगदीच साहजिकच आहे. त्याचे उत्तर सोनूने त्याच्या ट्विटमधून दिले आहे. तो म्हणतोय, बोड्डू नागा लक्ष्मी़ ही एक (दिव्यांग) अंध मुलगी आणि युटयूबर आहे. ती आंध्रप्रदेशातील वरीकुंटापाड या छोट्याशा खेड्यात राहते. तिने सूद फाऊंडेशनमध्ये १५००० रुपयांचा निधी आर्थिक साहाय्य म्हणून दिला आहे. हा पैसा तिच्या ५ महिन्यांच्या पेन्शनचा आहे. ही माझ्यासाठी सर्वात श्रीमंत भारतीय आहे. तुम्हाला कोणाचेही दुःख पाहण्यासाठी फक्त डोळ्यांचीच गरज असते असे नाही. ही एक रियल हिरो आहे. त्यामुळे सोनूचे लक्ष्मीला श्रीमंत म्हणणे अगदीच योग्य आहे नाही का…?

स्वतः दिव्यांग असून डोळे नसतानाही दुसऱ्याचे दुःख पाहणारी लक्ष्मी खरंच खऱ्या अर्थाने श्रीमंत आहे. जिला भावना आणि संवेदना कळतात. लक्ष्मीचा हा मदतीचा हात सोनूसाठी लाख मोलाचा आहे असे म्हणणे काही वावगे ठरणार नाही. लक्ष्मीच्या मदतीनंतर सोनूच्या फाऊंडेशनला मदत करण्यास अनेक लोक उत्सुक असल्याचे दिसत आहे. देशविदेशातील लोक त्याला मदत कशी पोहोचवू शकतो, याबद्दल विचारणा करत आहेत. सोनूच्या कामात खारीचा वाटा उचलण्यात सर्वच जण उत्सुक आहेत. लक्ष्मीची एक मदत जगातील अनेकांसाठी प्रेरणा ठरली आहे. तर सोनूसाठी हि एक उत्तम विचारधारणा त्याच्या कामासाठी स्फूर्ती देत आहे.

Leave a Comment