कोलकाता । 2020 हे वर्ष बॉलिवूडसाठी एका दुःस्वप्नासारखं जात आहे. बरेच अभिनेता आणि अभिनेत्री यांनी याच वर्षी जगाला निरोप देत गेले आहेत. 2020 अंतिम टप्प्यामध्ये असताना आणखीन एका अभिनेत्रीच्या निधनाची बातमी येत आहे. ‘डर्टी पिक्चर’ चित्रपटात विद्या बालनबरोबर काम करणारी अभिनेत्री आर्या बॅनर्जीचे (actress Arya Banerjee suicide)निधन झाले आहे. ती 33 वर्षांची होती. ती कोलकाताच्या जोधपुर पार्क भागात एका अपार्टमेंटमध्ये राहत होती. पोलिसांनी दरवाजा तोडून अभिनेत्रीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. (Dirty picture)
आर्याचे पूर्ण नाव देबदत्ता बॅनर्जी असे होते. ती सितारवादक निखिल बॅनर्जी यांची मुलगी होती. आर्याने तिची खोली आतमधून बंद केली होती. आजूबाजूच्या लोकांनी तिला आवाज दिले फोन केले मात्र, आतमधून कुठलाच प्रतिसाद येत नसल्यामुळे त्यांनी पोलीसांना याबाबत माहिती दिली.
तिच्या घरातून पोलिसांनी काही औषधे आणि दारूच्या बाटल्याही मिळाल्या आहेत. सध्या पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
पोलीस पुढील तपास करत आहेत. आर्याने डर्टी चित्रपटासोबतच ‘लव्ह सेक्स अँड चीटिंग’ या चित्रपटात काम केले आहे. आर्या तिच्या अपार्टमेंटमध्ये एकटीच राहत होती. 2020 हे वर्ष चित्रपटसृष्टीसाठी अतिशय वाईट केले आहे.
यंदा अनेक दिग्गज कलाकारांनी अचानक जगातून एक्सिट घेतली. इरफान खान, ऋषी कपूर, सुशांतसिंग राजपूत, एसपी बालसुब्रमण्यम यांच्यासह अनेक नावे आहेत.
दशात शेतकरी आंदोलन सुरुये अन लोक माझ्या बिकनीवर बोलतायत व्वा! भिडे गुरुजींची सोनू संतापली
सविस्तर वाचा👉 https://t.co/J4VsZmzNrp#HelloMaharashtra #FarmerBill2020 #bhide— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 11, 2020
कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक; तरुण व्यावसायिकाची 'आय लव्ह यू' लिहून हॉटेल रूममध्ये आत्महत्या
सविस्तर वाचा-👉 https://t.co/ljVnvsw0RT#HelloMaharashtra #sucide— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 11, 2020
सॅल्यूट! छापेमारीत जप्त केलेले तब्बल 45 कोटींचं 103 किलो सोनं CBIच्या कस्टडीमधून गायब
सविस्तर वाचा👉 https://t.co/0M55dei8ei#HelloMaharashtra #gold @cbic_india— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 12, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’