अभिनेत्री जुही चावलाने ‘5G’ तंत्रज्ञानाविरोधात केस केली दाखल; आज होणार पहिली सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री जूही चावला नेहमीच सोशल मीडियावरून आपल्या चाहत्यांना पर्यावरणाबाबत सजग करताना दिसते. अनेकदा ती पर्यावरणाविषयीच्या विविध पोस्ट्सही शेअर करत असते. भारतात लवकरच ‘5G’ तंत्रज्ञान लागू होणार आहे, असे वृत्त निघताच मात्र जुही बिथरली. कारण याचा पर्यावरणासह लोकांच्या आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत हे तंत्रज्ञान भारतात लागू होण्यापूर्वीच जुहीने ‘5G’ विरोधात तक्रार दाखल केली आहे. आज (३१ मे) न्यायालयात या केसवर पहिली सुनावणी होणार आहे.

 

टेलिकम्युनिकेशन उद्योग भारतात ‘5 G’ तंत्रज्ञान आणण्याची जोरदार तयारी करत आहेत. यामुळे पृथ्वीवर कोणताही मनुष्य, प्राणी, पक्षी आरोग्यदायी जीवन जगू शकणार नाहीत. आजच्या तुलनेत आरएफ रेडिएशन १० ते १०० पट वाढल्याने आरोग्यासाठी हे तंत्रज्ञान अत्यंत हानिकारक ठरेल. या ‘5G’ तंत्रज्ञानामुळे पृथ्वीच्या इकोसिस्टमचा मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात वाईट परिणाम होईल, असे यात म्हटले गेले आहे. तर अभ्यास आणि वैद्यकीय ​​पुराव्यांनुसार यामुळे बऱ्याच लोकांचे स्वास्थ्य बिघडले असून अनेकांचे डीएनए, सेल्स आणि ऑनगोन सिस्टमचे नुकसान झाले आहे. ज्यामुळे बरेच मोठे रोग देखील होऊ शकतात.

 

जुही स्वतः पर्यावरणाविषयी अतिशय जागरूक आहे. ती सध्या मुंबईपासून जवळ असलेल्या एका ठिकाणी स्वतः ऑर्गेनिक शेती करत आहे. त्यामुळे या तंत्रज्ञानाविषयी बोलताना जूही म्हणाली की, आम्ही प्रगत तंत्रज्ञान स्वीकारण्याच्या विरोधात नाही. आम्हाला नवीन तंत्रज्ञान देणारी नवीनतम उत्पादने वापरण्यात आनंदच होणार आहे.

अगदी वायरलेसच्या क्षेत्रातही.. तथापि, आम्ही देखील अशा अडचणीत आहोत की, जेव्हा आम्ही स्वतः वायरलेस गॅझेट्स आणि नेटवर्किंग सेल टॉवर्सद्वारे आरएफ रेडिएशनवर संशोधन आणि अभ्यास केला, तेव्हा आम्हाला कळले की, ही किरणे लोकांसाठी अत्यंत हानिकारक आहेत आणि त्यांच्या आरोग्यास हानी पोहोचवू शकतात.’

 

याबाबत जूही चावलाचे प्रवक्ते यांनी एक निवेदन जाहीर केले आहे. ते दाखल करत असलेल्या केस विषयी सांगताना म्हणाले की, याप्रकरणी कोर्टाचे लक्ष या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वेधले जावे, हा एकमेव यामागील उद्देश्य आहे. जेणेकरुन ते आहे सिद्ध करू शकतील की, ‘5G’ तंत्रज्ञान मनुष्य, प्राणी आणि पक्ष्यांसाठी किती सुरक्षित आहे. त्यांनी यावर संशोधन केले पाहिजे आणि त्यानंतरच ‘5G’ तंत्रज्ञान भारतात येणे सुरक्षित आहे अथवा नाही हे त्यांनीच ठरवले पाहिजे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊनच त्यांनी या संदर्भात निर्णय घ्यावा, इतकी एकच विनंती आहे.

Leave a Comment