नुपूर शर्मा प्रकरणात कंगनाची उडी; म्हणाली की, हिंदू देवांचा अपमान केला जातो तेव्हा…..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |भाजप प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद  देशभर आणि विदेशातही उमटले आहेत. हा वाद अद्यापही सुरु असतानाच बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत हिने आता या प्रकरणात उडी घेतली असून नुपूर शर्मा यांचे समर्थन केलं आहे. कंगना अनेकदा बॉलिवूडपासून राजकीय मुद्द्यांवर बोलत असते. यावेळीही तिने या प्रकरणावर आपलं मत व्यक्त करत नुपूर शर्मा याना पाठिंबा दिला आहे.

कंगना रणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवर म्हंटल की नुपूर शर्माला तिचे मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यांना मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या धमक्या मला दिसत आहेत. ते दररोज हिंदू देवांचा अपमान करतात म्हणून आम्ही न्यायालयात जातो. कोणीही डॉन बनण्याचं कारण नाही. हा अफगाणिस्तान नाही. आपल्याकडे लोकशाही प्रक्रियेद्वारे चालणारे सरकार आहे.  हे फक्त त्यांच्यासाठी मी लिहितेय जे लोक सारखं ही गोष्ट विसरतात.

दरम्यान, नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचे तीव्र पडसाद संपूर्ण जगभर उमटले आहेत. त्यांच्या या वक्तव्यानंतर अल कायदाचे एक धमकीचे पत्र व्हायरल होत आहे. ज्यामध्ये दिल्लीसह मुंबई, गुजरात आणि यूपीमध्ये आत्मघातकी हल्ल्याची धमकी देण्यात अली आहे.

आम्ही पैगंबरांच्या अपमानाचा बदला घेऊ. पैगंबर मुहम्मदचा अपमान करणाऱ्यांना आम्ही मारून टाकू. आम्ही इतरांना या लढ्यात सहभागी होण्यास सांगू. पैगंबर मुहम्मद यांच्यावर अत्याचार करणाऱ्यांना आम्ही माफ करणार नाही. दिल्ली, मुंबई, यूपी आणि गुजरातमधील भगव्या कार्यकर्त्यांना संपवणार. तो त्याच्या घरात लपू शकणार नाही किंवा सुरक्षा दलही त्याला वाचवू शकणार नाही असे अल कायदाने म्हंटल

Leave a Comment