Monday, January 30, 2023

शेतकरी आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय ; कंगनाने सोडलं शेतकऱ्यांवर टीकास्त्र

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | मोदी सरकारच्या कृषी कायद्या विरोधात देशभरातील शेतकरी आक्रमक झाला असून शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन पुकारलं आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलना वरून अभिनेत्री कंगना राणावत आणि दिलजीत सिंग यांच्यात खडाजंगी झाली. एकीकडे कंगना शेतकऱ्यांच्या आंदोलनाला विरोध करत आहे. तर दुसरीकडे दिलजीत शेतकऱ्यांना पाठिंबा देत कंगनावर निशाणा साधत आहे. दोघांमध्ये सुरु असलेलं हे शीतयुद्ध आता आणखी पेटलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे ७० हजार कोटींचं नुकसान होतंय असा दावा कंगनाने केला आहे. तिने या ट्विटद्वारे दिलजीतवर देखील निशाणा साधला आहे.

शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे आतापर्यंत ७० हजार कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. परिणामी लहान उद्योग आणि कारखान्यांमध्ये आर्थिक मंदी आली आहे. कदाचित या आंदोलनामुळे दंगल देखील होऊ शकते. प्रियांका चोप्रा आणि दिलजीत दोसांज यांनी सांगावं या आर्थिक मंदीला जबाबदार कोण? अशा आशयाचं ट्विट करुन तिने शेतकरी आंदोलनावर टीका केली आहे. तिनं या ट्विटसोबत टाईम्स नाऊचा एक व्हिडीओ देखील शेअर केला आहे.

- Advertisement -

https://twitter.com/KanganaTeam/status/1339154737162153985?s=19

शेतकऱ्यांकडून केंद्र सरकारनं केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध होत आहे. दिल्ली आणि दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू असून, रस्ते बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना सीमेवरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’