‘या’ सिनेमातून कतरिना कैफची बहीण इसाबेल ठेवणार बॉलीवूडमध्ये पाऊल; पाहा फर्स्ट लुक

मुंबई । गेल्या वर्षभरापासून स्टार अभिनेत्री कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ बॉलीवूडमध्ये पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. दरम्यान, इसाबेलची प्रतीक्षा संपली असून ‘सुस्वागतम खुशामदीन’ या सिनेमातून ती बोललीवूडमध्ये डेब्यू करतेय. इसाबेलने तिच्या डेब्यू सिनेमाचे दोन पोस्टर शेअर करत ही माहिती दिली.

Keep your head down and work hard: Katrina Kaif's advice to younger sister  on Bolly debut - Film & TV - Images

‘सुस्वागतम खुशामदीन’ या सिनेमात ती अभिनेता पुलकित सम्राटसोबत स्क्रिन शेअर करणार आहे. सिनेमात पुलकीत अमन नावाचे पात्र साकारणार आहे आणि इसाबेल आग-यात राहणा-या नूरची भूमिका साकारणार आहे. याआधी इसाबेल ‘टाईम टू डान्स’ या सिनेमातून डेब्यू करणार अशी चर्चा होती. यात सूरज पांचोली तिचा हिरो म्हणून दिसणार होता. या सिनेमाचे शूटींग सुरु झाल्याचीही खबर होती. मात्र तूर्तास या चित्रपटाबद्दल काहीही अपडेट नाहीत.

Katrina Kaif's sister Isabelle to star with Pulkit Samrat in Suswagatam  Khushaamadeed | Entertainment News,The Indian Express

या चित्रपटाचा निर्माता सलमानने या चित्रपटाचा एक मोठा भाग नव्याने शूट करण्याचे सांगितले होते. चित्रपटाची कथा ज्यापद्धतीने पडद्यावर रेखाटली गेली, ती सलमानला आवडली नसल्याची माहिती होती. कदाचित याचमुळे इसाबेलचा डेब्यू रखडला होता.

Katrina Kaif: Watch: Katrina Kaif's in-house chef is none other than her  sister Isabelle Kaif | Hindi Movie News - Times of India

2019 मध्ये इसाबेलने ‘क्वाथा’ नावाच्या सिनेमाची घोषणा केली होती. यात सलमानचा मेहुणा आयुष शर्मा दिसणार आहे. तिचा हा सिनेमा यावर्षी रिलीज होईल अशी अपेक्षा आहे. अलीकडे इसाबेल ‘माशाल्लाह’ या पंजाबी गाण्याच्या व्हिडीओत दिसली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

You might also like