WeCreativez WhatsApp Support
Our support team is here to answer your questions. Ask us anything!
Hi, how can I help?
बॉलिवुड

बॉलिवूडची धकधक गर्ल झाली ५२ वर्षांची

Untitled design
Untitled design

मुंबई प्रतिनिधी | बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा आज 52 वा वाढदिवस. 15 मे 1967 रोजी जन्मलेल्या माधुरीने 90 च्या दशकात बॉलिवूडवर राज केलं. माधुरीने 1986 मध्ये अबोध आणि स्वाती या सिनेमातून करिअरला सुरुवात केली. नुकताच आलेल्या कलंक या सिनेमात माधुरी दीक्षित आणि संजय दत्त अनेक वर्षांनी एकत्र पाहायला मिळाले. माधुरीने डिव्हाइन चाइल्ड हायस्कूल शाळेमध्ये आपले प्राथमिक शिक्षण घेतले.

नंतर मुंबई विद्यापीठात प्रवेश घेतल्यावर सूक्ष्मजीवतज्ज्ञ होण्याचा तिचा मानस होता.ती तरबेज कथक नृत्यांगना आहे. तिने सुमारे ८ वर्षे नृत्याचे शिक्षण घेतले होते.माधुरीने १९८४ साली “अबोध” या चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. माधुरीला बॉलिवूडमध्ये स्थान मिळवून देणारा सिनेमा म्हणजे १९८८ साली प्रदर्शित झालेला ‘तेजाब’. बॉक्स ऑफिसवर माधुरीचा हा पहिला हिट चित्रपट होता. या चित्रपटाकरिता तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तिला लहाणपणापासून डॉक्टर बनण्याची इच्छा होती. पण, ती पूर्ण न झाल्याने तिने आपला जीवनसाथी डॉक्टरच निवडला.

माधुरीने डॉ. श्रीराम नेने यांच्याशी विवाह केला. १७ ऑक्टोबर १९९९ साली माधुरी विवाहबद्ध झाली. २००२ साली ‘देवदास’ प्रदर्शित झाल्यानंतर आपल्या मुलांची देखभाल करण्याकरिता तिने चित्रपटसृष्टीपासून लांब राहणे पसंत केले. चार वर्षांच्या मध्यांतरानंतर माधुरीने २००७ साली ‘आजा नचले’ चित्रपटाने पुनर्पदार्पण केले. ‘देढ इश्किया’ आणि ‘गुलाब गँग’ या चित्रपटांमध्येही ती झळकली.

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook