Bollywood : 2022 मध्ये अवघ्या 5 महिन्यात संगीत क्षेत्राने गमावले ‘हे’ 7 दिग्गज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Bollywood : 2021 साली आपण बॉलीवूड आणि टीव्ही मध्ये काम करणाऱ्या अनेक कलाकारांना गमावले. 2022 वर्षांमध्ये असे काही होणार नाही असे वाटत होते मात्र या वर्षाच्या अवघ्या 5 महिन्यांतच आपण संगीत क्षेत्रातील 7 मोठ्या स्टार्सना गमावले. यामध्ये लता मंगेशकर, बप्पी लाहिरी आणि केके सारख्या मोठ्या नावांचा समावेश होता.

KK: It's high time I release another album because I owe it to my fans -  Hindustan Times

कृष्णकुमार कुननाथ उर्फ ​​के.के यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने नुकतेच निधन झाले. 31 मे रोजी त्याने जगाचा निरोप घेतला. बॉलीवूडमध्ये अनेक सुपरहिट गाणी देणाऱ्या गायकांपैकी केके एक होता. त्याच्या अचानक जाण्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. तो 53 वर्षांचा होता. त्याने अगदी शेवटच्या श्वासापर्यंत संगीत क्षेत्राची सेवा केली. Bollywood

Lata Mangeshkar Death Virat Kohli, Shikhar Dhawan, KKR Sports Fraternity  Tribute To Lata Mangeshkar | Lata Mangeshkar के गीतों के साथ अपनी यादों को  जोड़ श्रद्धांजलि दे रहे हैं खेल जगत के

भारताची गान कोकिळा आणि भारतरत्न पुरस्कार विजेत्या लता मंगेशकर यांनी 6 फेब्रुवारी 2022 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. 1940 ते 2000 च्या दरम्यान कै. लता मंगेशकर यांनी आपल्या आवाजाने लाखो लोकांना भुरळ पाडली. संगीत विश्वातील योगदानामुळे त्यांना ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’, ‘क्वीन ऑफ मेलोडी’ आणि ‘व्हॉइस ऑफ इंडिया’ अशीही नावे मिळाली. Bollywood

Meet Sandhya Mukherjee, the 90-year-old Bengali music legend who turned  down Padma Shri | India News,The Indian Express

पार्श्वगायिका आणि गिटार वादक असलेल्या संध्या मुखर्जी यांचेही 15 फेब्रुवारी रोजी निधन झाले. वाढत्या वयातील शारीरिक समस्यांमुळे त्यांचा मृत्यू झाला.

90s Pop Sensation Taz Aka Tarsame Singh of Stereo Nation Passes Away -  Sentinelassam

तरसेम सिंग सैनी उर्फ ताज या नावाने ओळखल्या या गायकाने 29 एप्रिल रोजी लंडनमध्ये अखेरचा श्वास घेतला. लोकं त्याला Taz from Stereo Nation असेही म्हणत. त्याने ‘थोडा दारू विच प्यार मिल दे’, ‘नाचेंगे सारी रात’ सारखी अनेक हिट गाणी दिली.

Shiv Kumar Sharma: The maestro who straddled classical and popular music -  BBC News

दिग्गज संतूर वादक आणि संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांचे 10 मे रोजी हृदयविकाराच्या झटक्याने मुंबईत निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. हे संगीत क्षेत्रातील एक मोठे नाव होते. त्यांनी बॉलिवूड मधील अनेक मोठ्या गायकांसोबत काम केले आहे. तसेच त्यांनी हरिप्रसाद चौरसिया यांच्या बरोबर मिळून अनेक हिट गाणी देखील दिली आहेत.Bollywood

Remembering Bappi Lahiri | Filmfare.com

15 फेब्रुवारी रोजी ‘डिस्को किंग’ म्हणून ओळखले जाणारे बप्पी लाहिरी यांनी जगाचा निरोप घेतला. ते 69 वर्षांचे होते. बप्पी लाहिरी यांनी फक्त हिंदीच नाही   तर बंगाली, तेलुगू, तमिळ, कन्नड, गुजराती चित्रपटात देखील गाणी गायली आहेत. त्यांनी अनेक चित्रपटांना संगीतही दिले आहे. बप्पी लाहिरी यांचे जगभरातही लाखो चाहते आहेत. भारतात ‘डिस्को बिट’ लोकप्रिय करण्याचे श्रेय बप्पी लाहिरी यांना जाते.  Bollywood

sidhu moose wala: Guns & Lyrics: Sidhu Moose Wala was a rebel without a  pause, his songs stoked controversy for promoting use of weapons & violence  - The Economic Times

केकेच्या मृत्यूच्या दोनच दिवस आधी पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ते गायक तर होतेच मात्र त्या बरोबरच त्यांनी राजकारणातही प्रवेश केला होता. सिद्धू मुसेवालाचे यांचे चाहते कॅनडा, यूके आणि अमेरिकेतही आहेत. त्यांच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे त्यांच्या चाहत्यांना दु:ख झाले आहे.Bollywood

हे पण वाचा : 

Shane Warne : 23 षटकांनंतर 23 सेकंदांसाठी सामना थांबवला, ‘या’ दिग्गजाला अशा प्रकारे वाहिली गेली श्रद्धांजली

‘या’ penny stocks ने गुंतवणूकदारांना एका वर्षात दिला 6,000 टक्के नफा !!!

Fixed deposits : आता ‘या’ स्मॉल फायनान्स बँकेनेही FD वरील व्याजदरात केली वाढ !!!

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ, नवीन दर तपासा

Roman Saini : IAS ची नोकरी सोडून सुरु केला स्वतःचा व्यवसाय; आज आहे तब्ब्ल 15,000 कोटींच्या कंपनीचा मालक

Leave a Comment