‘हे’ आहेत २०१९ फ्लॉप चित्रपट..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

चंदेरी दुनिया । २०१९ या वर्षात खास करून बिग बजेट चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. यात कलंक आणि पानिपत ही नावे पुढे आहेत. २०१९ मधील हे सर्वात बिग बजेट चित्रपट म्हणावी तशी जादू प्रेक्षकांवर चालवू शकले नाहीत. धर्मा प्रोडक्शनचा कलंक हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याची प्रचंड चर्चा रंगली होती. मात्र ज्यावेळी तो प्रदर्शित झाला त्यावेळी प्रेक्षकांचा हिरमोड झाला. कलंक या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर केवळ १४५.६२ कोटींची कमाई केली. आलिया भट्ट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा, आदित्य रॉय कपूर अशी मोठी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. या चित्रपटाचे बजेट १५० कोटींचे होते.

तर आशुतोष गोवारीकर निर्मित, दिग्दर्शित ‘पानिपत’ हा चित्रपटाची देखील खूप उत्सुकता प्रेक्षकांमध्ये होती. हा चित्रपट येण्याआधी या ना त्या कारणाने वादात अडकला. अर्जून कपूर, क्रीती सेनॉनची मुख्य भुमिका असणार्‍या या चित्रपटाला अजय-अतुलने संगीत दिले होते. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटला. केवळ ४६.९९ कोटींची कमाई या चित्रपटाने केली.

देसी गर्ल प्रियांका चोप्राचा ‘द स्काय इज पिंक’ ची चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. कारण तीन वर्षांनंतर प्रियांका बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार होती. मात्र प्रत्यक्षात हा चित्रपट फारसा चालला नाही. उत्तम कथानक असूनही या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. प्रियांका चोप्रा, जायरा वसीम आणि फरहान अख्तर ही तगडी स्टारकास्ट असतानासुद्धा या चित्रपटाने केवळ ३४.४१ कोटींची कमाई केली.

२०१२ साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेला ‘स्टुडंट ऑफ द इयर’ हा चित्रपट सार्‍यांच्याच लक्षात असेल. हा चित्रपट त्यावेळी प्रचंड लोकप्रिय ठरला. त्यामुळेच या चित्रपटाचा सिक्वल करण्याचा निर्णय करण जोहरने घेतला. या चित्रपटाच्या सिक्वलमधून तारा सुतारिया, अनन्या पांडे आणि टायगर श्रॉफ हे कलाकार प्रेक्षकांच्या भेटीला आले. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई करु शकला. या चित्रपटाने ९७.८१ (सत्त्यानो) कोटी रुपयांची कमाई केली होती.

जगातील सर्वांत वृद्ध महिला शार्पशूटर्सच्या जीवनावर आधारित ‘सांड की आँख’ हा चित्रपट विशेष चर्चेला गेला होता. तापसी पन्नू आणि भूमि पेडणेकर यांची या चित्रपटात मुख्य भूमिका आहे. खरं तर या चित्रपटामध्ये अनावश्यक सीनचा भरणा करण्यात आला आहे. आणि प्रेक्षक कंटाळले. अनुराग कश्यप निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले आहे. या चित्रपटाने केवळ ३०.३६ कोटींची कमाई केली.

कंगना रणावत आणि राजकुमार राव यांच्या ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी आशा होती. निर्माती एकता कपूरने या चित्रपटाची निर्मीती केली होती. चित्रपटाला उत्तम कथानक असूनही या वर्षातला हा सर्वाधिक फ्लॉप चित्रपट ठरला.

२०१९ या सरत्या वर्षात बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचे ‘भारत’ आणि ‘दबंग ३’ हे दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आले. पण त्या भारत या चित्रपट बर्‍यापैकी बॉक्स ऑफिसवर कमाई करण्यात यशस्वी ठरला पण दबंग ३ चांगलाच आपटला. तब्बल ७ वर्षानंचर सलमान चुलबुल पांडे बनून प्रेक्षकांसमोर आला होता. मात्र सलमान फॅन्स वगळता प्रेक्षकांनी त्याला स्विकारले नाही. दबंग ३ या चित्रपटात सई मांजरेकर, सोनाक्षी सिन्हा सलमान खानबरोबर झळकल्या.

Leave a Comment