पुरुषांनो, सार्वजनिक टॉयलेट्स वापरताना जरा तरी..; अभिनेत्री हेमांगी कवी का संतापली ??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

व्हायरल पॅटर्न | अभिनेत्री हेमांगी कवी हिने सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या वास्तव परिस्थितीवर भाष्य करणारी एक जळजळीत फेसबुक पोस्ट लिहीली असून यात तिने पुरुषवर्गाला भान ठेवून आपला लघुशंकेचा कार्यक्रम करण्याच्या तसेच टॉयलेट्स स्वच्छ ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. पाहुयात तिची पोस्ट नक्की काय आहे.

हल्ली बऱ्याच कामाच्या ठिकाणी western toilets (commode) असतात. त्यात काही common toilets म्हणजे स्त्री- पुरुषांकरता एकच toilet असतं. अश्यावेळी ते toilet कसं वापरावं याचं ज्ञान हे शाळेत किंवा घरातच पालकांनी लहानवयात आपल्या मुलामुलींना द्यायला हवं. अत्यंत गरजेचा विषय आहे समजून! पुरुष मूत्र विसर्जन करताना commode च्या ring वर, आजूबाजूला जी काही रांगोळी करून ठेवतात ते बघूनच अंगावर शिसारी येते. स्त्रियांची मूत्र विसर्जन करायची पद्धत या पुरुषांना माहीत नसते का? की याचा विचारच केला जात नाही? की अश्या घाणेरड्या commode वर त्या कश्या बसत असतील? बसत नसतील तर मग कशा manage करत असतील? त्यांचा हा मूलभूत नैसर्गिक हक्क बजावताना काय द्राविडी प्राणायाम करत असतील याचा विचार होत नाही का? मासिक पाळी ( #periods, menustral cycle) च्या वेळी काय करत असतील याचा विचार होत नाही का?

होत नसेल तर करावा. स्त्री पुरुष दोघांनी! #Commode कसं वापरावं हे कळत, माहीत नसेल तर न लाजता विचारावं, शिकून घ्यावं! कारण त्याचा थेट संबंध दोघांच्या ही hygiene, health शी असतो! सगळ्यांनी या विषयी openly बोलावं! कित्येकदा काहीजण आपला कार्यभाग उरकल्यावर flush ही करत नाहीत… अरे काय? एक button दाबायचं असतं फक्त… तेवढं ही होऊ नये आपल्याकडून? बरं ते दिवसभर पुन्हा आपल्यालाच वापरायचं असतं. असो… तर commode, western toilet, युरोपियन toilet कसे वापरावे याची आपल्याला google करून माहिती मिळवता येईल पण आपल्यातला साधं flush button ही push करता येत नसल्याचा आळस बघता इथे मी मला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. पुरुषांनी मूत्र विसर्जन करताना commode ची रिंग (frame) वर करून आपला कार्यभाग उरकून flush करून झाल्यावर पुन्हा ती frame toilet seat वर पाडायची असते.  Commode seat स्वच्छ, कोरडं कसं राहील याकडे लक्ष द्यावं! व्यवस्थित #flush झालंय की नाही ते पाहावं जेणे करून दुर्गंधी येऊन जीव गुदमरून जाऊ नये याची खात्री करून मगच बाहेर पडावं. काही पुरुष आम्ही ती रिंग वर करू पण पुन्हा ती खाली पाडणार नाही अश्या भलताच पुरूषी अहंकार गाजवतात त्यांना कोपऱ्यापासून दंडवत!

या गोष्टीकडे आपण कधीच गांभीर्याने पाहत नाही किंवा हसण्याचा, चेष्टेचा विषय म्हणून सोडून देतो… पण त्यामुळे होणारे अनेक त्रास, #infections याकडे अनाहूतपणे आपण दुर्लक्ष करतोय. हे शिकून किंवा समजून घेण्यात काहीच कमीपणा नाही. उलट स्त्रियांचं आरोग्य यावर ही अवलंबून असतं याचा विचार करावा! प्रत्येकाला ‘मनासारखं’ ‘मनोसोक्त’ हलकं व्हावंसं वाटत असतं याचा आदर व्हावा एवढीच इच्छा!

https://m.facebook.com/story.php?story_fbid=3697958260223776&id=100000289144138

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.” 

Leave a Comment