अक्षयने केली ‘बेल बॉटमची’ घोषणा …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी | अक्षय कुमार हा अभिनेता वर्षभरातून २ ते ३ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतो . आता तशी अक्षयची ओळखच निर्माण झाली आहे . अक्षयच्या चित्रपटांची आणखी एक ओळख म्हणजे वास्तव कथा आणि कथेतून मिळणारा संदेश… टॉयलेट एक प्रेम कथा , रुस्तम , पॅड-मॅन असे अनेक चित्रपट अक्षय ने केले आहेत , ज्या विषयांवर आजही बोलणे टाळले जाते . किंवा काही वास्तव कथा ज्याच्याशी सामान्य दर्शक अनभिद्न्य आहेत .

अक्षय एकीकडे सूर्यवंशी या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्थ आहे . अशातच त्याने आता आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे . अक्षयने त्याचा आगामी येणार प्रोजेक्ट बेल बॉटमची घोषणा केली आहे .

अक्षयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर बेल बॉटमचा फर्स्ट लुक शेअर केला आहे . अक्षयच्या हाऊसफुल या चित्रपटाने चांगली कमाई केली आहे . त्या व्यतिरिक्त अक्षयकडे गुड न्यूज , सूर्यवंशी , आणि लक्ष्मी बॉम्ब हे चित्रपट आहेत . बेल बॉटम हा चित्रपट देखील वास्तव घटनेवर आधारित असून अक्षयचा बेल बॉटम मधील रिच लूक प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण करणारा आहे .

Leave a Comment