लॉकडाउनमध्ये नाशिक दौरा केल्यानं अक्षय कुमार अडचणीत? भुजबळांनी दिले चौकशीचे आदेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नाशिक । बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार नाशिक दौऱ्यामुळे अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. जुलै महिन्याच्या सुरुवातीला अक्षय कुमार २ दिवस नाशिकजवळ मुक्कामी होता. अक्षय कुमार हेलिकॉप्टरने नाशिकमध्ये आला होता त्यामुळे अक्षय कुमारचा हा दौरा वादात सापडण्याची शक्यता आहे. लॉकडाउनच्या काळात हेलिकॉप्टरला परवानगी व शहर पोलिसांनी दिलेला बंदोबस्त या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले असल्याचे वृत्त लोकसत्ता वृत्तपत्राने दिलं आहे.

अभिनेता अक्षय कुमार याच्या नाशिक दौऱ्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी, लॉकडाऊनमध्ये रिसॉर्टमधील वास्तव्य यामध्ये काही गैर घडले असेल तर चौकशी केली जाईल, असे नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी लोकसत्ता वृत्तपत्राला सांगितलं आहे.

लोकसत्ता वृत्तपत्राच्या माहितीनुसार, अभिनेता अक्षय कुमार हॅलिकॉप्टरने २ दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर आला होता. त्रंबकेश्वर रोडवरील सपकाळ कॉलेजच्या हेलिपॅडवर त्याचं हेलिकॉप्टर उतरलं होतं. तसेच ग्रेप काउंटी रिसॉर्टमध्ये तो वास्तव्यास होता. अक्षय कुमारला या दौऱ्यासाठी नाशिक शहर पोलिसांकडून सुरक्षा मिळाली होती. नाशिकमध्ये मार्शल आर्ट अ‍ॅकेडमी किंवा निसर्गोपचार केंद्र सुरु करण्याच्या उद्देशानं पाहणी करण्यासाठी अक्षय कुमारने नाशइक दौरा केला आहे. लॉकडाउनमध्ये सर्वजण रस्ते मार्गे प्रवास करत असताना अक्षय कुमार हेलिकॉप्टरने कसा आला? ग्रामिण हद्दीत आला असताना शहर पोलिसांकडून सुरक्षा कशी? रिसॉर्ट बंद असतानाही प्रवेश कसा मिळाला. यासारखे प्रश्न अक्षय कुमारच्या नाशिक दौऱ्यामुळे उपस्थित झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment