सुशांत सिंगच्या बदल्यापोटी आलिया भट स्टारर ‘सडक 2’ ट्रेलर लोकांकडून डिसलाईक..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | हरहुन्नरी अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या वादग्रस्त मृत्यूच्या तपासाचं कोडं अद्यापही उलगडलेलं नाही. बॉलिवूडमधील घराणेशाहीला म्हणजेच नेपोटीजमला विरोध करण्यासाठी नेटकऱ्यांनी उड्या घेतल्या असून याचा पहिला फटका संजय दत्त आणि आलिया भट्टच्या सडक 2 या चित्रपटाला बसणार असं दिसत आहे. सडक 2 चा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच लाईक्सच्या दहा पटींनी डिस्लाईक्स (नापसंती) दर्शवणारे लोक समोर आले आहेत.

नेटकऱ्यांनी ट्रेलरवर दुपारी २ वाजेपर्यंत ८० हजारहून अधिक कमेंट्स आल्या. परंतु या ट्रेलर पाहून नेटकऱ्यांनी यातील कुणाचाही अभिनय सुशांतच्या तोडीचा नव्हता अशी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. या चित्रपटाच्या निर्मितीमध्ये महेश भट्ट यांचा तर प्रमुख भूमिकांमध्ये संजय दत्त, आदित्य रॉय कपूर, आलिया भट्ट यांचा समावेश आहे.

सुशांतच्या मृत्यूनंतर प्रदर्शित झालेल्या ‘दिल बेचारा’ चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद मिळाला होता. डिस्ने हॉटस्टारतर्फे ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता आणि या चित्रपटाने अनेक जुने रेकॉर्डही तोडले होते. आता मात्र याच प्लॅटफॉर्मवर रिलीज होणाऱ्या सडक 2 विषयी बॉलिवूडप्रेमींनी नाराजी दर्शवली असुन सुशांतच्या आत्महत्येचा बदला घेतला जाईल असं उत्तरच जणू बाकी बॉलिवूड कलाकार,निर्माते आणि दिग्दर्शक यांना दिलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com