अनुपम खेरच्या 85 वर्षीय आईने केली कोरोनावर मात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांची आई दुलारी याना कोरोनाची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता मात्र त्यांची तब्बेत ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. काही दिवस त्या होम क्वारंटाईनमध्ये असतील. अनुपम खेर यांनी आपल्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करून याबबद्दल सांगितले.

अनुपम खेर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘कोकिलाबेन हॉस्पिटलमधील डॉक्टरांच्या सर्व वैद्यकीय निकषांवर ती ठीक असल्याचे सांगण्यात आले आहे आणि आता तिला घरातच होम क्वारंटाईनमध्ये राहावे लागेल. सुरक्षित रहा परंतु कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण / कुटुंबियांशी चांगल्या प्रकारे मदत करा. डॉक्टर, बीएमसी अधिकारी व कर्मचारी हे खरे नायक आहेत. खेर यांनी एक व्हिडिओही शेअर केला आहे. त्यांनी व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, ‘कोकिलाबेनच्या डॉक्टरांनी सांगितले आहे की माझी आई आता ठीक आहे आणि ती लवकरच घरी जाऊ शकते.डॉक्टरांनी म्हटले आहे की आईला 8 दिवस घरी सेल्फ क्वारंटाईनमध्ये राहणे आवश्यक आहे. माझा भाऊ राजू, त्याची पत्नी रीमा आणि माझी भाची ब्रिंडा हे सुद्धा आता बरे होत आहेत.

अनुपम खेरची आई, भाऊ अभिनेता राजू खेर, त्यांची पत्नी आणि मुलगी 12 जुलै रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळले होते. अनुपम खेर यांचा अहवाल मात्र नेगटीव्ह आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment