बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने व्यक्त केली भीती”…तर थाळी वाजवण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसेल”

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरातील लोक सध्या त्रस्त आहेत. आतापर्यंत दोन हजारांहुन अधिक लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये रुग्णालयात काम करणारे काही कर्मचारी देखील आहेत. अशा प्रतिकूल परिस्थित जर डॉक्टरांना करोनाची लागण झाली तर आपल्या देशाचं काही खरं नाही. अशी भीती बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप याने व्यक्त केली आहे.

“आपल्या देशवासीयांना कोरोनापासुन सुरक्षित ठेवण्यासाठी आपले सर्व आरोग्य कर्मचारी, परिचारिका आणि डॉक्टर्स दिवस-रात्र काम करत आहेत. ही सर्व लोकं तंदुरुस्त असणं खूप गरजेचं आहे. कारण त्यांच्यावरच आपलं भवितव्य अवलंबून आहे. जर त्यांना काही झालं तर, कितीही थाळ्या वाजवा किंवा दिवे पेटवा, आपलं काही खरं नाही.” असं ट्विट अनुराग कश्यपने केलं आहे.

अनुराग कश्यप हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडींवर तो नेहमीच आपली मतं बिनधास्तपणे मांडताना दिसत असतो. देशभरात सध्या कोरोना विषाणूने आपली दहशत पसरवली आहे. या पार्श्वभूमीवर अनुरागने केलेले हे ट्विट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment