दीपिकाने घेतला कोरोना व्हायरसचा धसका; ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये जाणं टाळलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेत्री दीपिका पादुकोणने जागतिक कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या ‘पॅरिस फॅशन वीक’मध्ये जाण्याची आपली योजना रद्द केली आहे. पॅरिस फॅशन वीक ३ मार्च पर्यंत सुरु राहणार आहे. दरम्यान, लक्झरी ‘फॅशन हाऊस लूई वीटॉन’ ने दीपिकाला पॅरिस फॅशन वीकमध्ये सामील होण्यासाठी आमंत्रण पाठवले होते. मात्र, कोरोना व्हायरसच्या वाढत्या संसर्गामुळं दीपिकाने पॅरिसची आपली ट्रिप नुकतीच रद्द केली आहे.

दीपिकाच्या अधिकृत प्रवक्त्याने सांगितले की, “सध्या चालू असलेल्या पॅरिस फॅशन अंतर्गत लूई वीटॉन के फॅशन वीक २०२० या कार्यक्रमात भाग घेण्यासाठी दीपिका पादुकोण फ्रान्सला जाणार होती, मात्र, फ्रान्समधील कोरोना व्हायरसच्या अलिकडच्या परिस्थितीमुळे तिने आपला प्रवास रद्द केला आहे.” अशी माहिती या प्रवक्त्याने प्रसार माध्यमांना दिली आहे. भारतातही कोरोना व्हायरसचा धोका वाढत आहे. या व्हायरसने दिल्लीतही दार ठोठावले आहे. दिल्लीतील एका व्यक्तीला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे आढळले आहे. तर तेलंगणामध्ये कोरोना व्हायरसच्या संसर्गाचे एक प्रकरण समोर आलं आहे.

दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

Leave a Comment