भारतातील मशिदी बंद करण्याबाबत जावेद अख्तर म्हणतात..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात २१ दिवसांचालॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. या काळात खबरदारी म्हणून देशातील सर्व धार्मिक स्थळ बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशाचे पालन करत लॉकडाउनमध्ये अनेक धार्मिक स्थळंही बंद केली आहेत. परंतु काही ठिकाणी मशिदींमध्ये नमाज पठण करण्यात येत असल्याचं वृत्त समोर आलं होतं. यावरून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांनी भारतातील मशिदीही बंद करण्याची मागणी केली आहे. त्यांनी स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांचा हवाला देत एक ट्विट केलं आहे.

“जो पर्यंत करोनाचं संकट आहे तोपर्यंत सर्व मशिदी बंद करण्यात याव्यात असा दारूल देवबंदनं फतवा काढण्याची मागणी एक स्कॉलर आणि अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष ताहिर महमूद यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीचं मी समर्थन करतो. जर काबा आणि मदिना येथील मशिदी बंद होऊ शकतात तर भारतातील का नाही,” अशा आशयाचं ट्विट जावेद अख्तर यांनी केलं आहे.

दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 79726 30753 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.

Leave a Comment