बाॅक्स ऑफिसवर ५०० कोटींची कमाई केलेल्या ‘बाहुबली द बिगिनिंग’ बद्दल ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बाहुबली द बिगिनिंगला आज पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाने ऐतिहासिक यश मिळवले. बॉक्स ऑफिस वर तर या चित्रपटाने 500 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाद्वारे प्रभासने प्रथमच हिंदी भाषिक क्षेत्रात पदार्पण केले. बाहुबली मुळे प्रभास खूप मोठा सुपरस्टार झाला.

प्रभासला सुपरस्टार बनवणाऱ्या या ‘बाहुबली’ चित्रपटाला केवळ असच काही भारताचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट म्हटले जात नाही,यामागील अनेक कारणे आहेत, जाणून घेऊया नक्की कोणती अशी करणे आहेत त्यामुळे बाहुबली देशातील सर्वांत मोठा चित्रपट ठरला.

1. हा पहिला चित्रपट होता ज्यासाठी एक खास भाषा तयार केली गेली होती. या भाषेला किलिकी असे नाव देण्यात आले. या चित्रपटामध्ये त्याला कलाकेय असे म्हणतात. यात जवळजवळ 750 शब्द होते आणि यात 40 व्याकरणाचे नियम देखील होते.

2. रिलीजच्या वेळी हा भारतातील सर्वात महागडा चित्रपट होता. त्यावेळी याची किंमत सुमारे 200 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात होते. हा चित्रपट दीडशे कोटींमध्ये बनवायचा होता पण बजेट वाढतच राहिले. त्याच्या क्लायमॅक्सवरच 30 कोटी रुपये खर्च झाले.

3.जगभरातील सुमारे 15 संगणक कंपन्यांनी यासाठी व्हीएफएक्स म्हणून काम केले. 90 टक्के बाहुबली फक्त संगणकावर बनला होता. सुमारे 5000 व्हिज्युअल इफेक्ट शॉट्स त्यात घालण्यात आले.

4. त्याच्या पोस्टरने जागतिक विक्रमही नोंदविला आहे. रिलीझ होताना, त्याचे पोस्टर 50000 चौरस फूट मध्ये बनविलेले होते. गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्सचा हा सर्वात मोठा चित्रपट पोस्टरचा विक्रम मानला जात होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment