तमाम मराठी जनांना ‘पानिपत’ सिनेमा पाहण्याचं राज ठाकरेंनी केलं आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई प्रतिनिधी । मोठी उत्सुकता लागून असलेला ‘पानिपत’ हा चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच ६ डिसेंबर ला प्रदर्शित होत आहे. ‘पानिपत’च्या तिसऱ्या लढाई वर आधारित असलेल्या या चित्रपटाबद्दल मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करत असून अर्जुन कपूर , क्रिती सेनॉन , संजय दत्त या तगड्या कलाकारांच्या या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहेत. सध्या सर्व स्तरातून चित्रपटाला शुभेच्छा देण्यात येत आहेत. त्यात आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी पानिपत या चित्रपटाची सोशल मीडियावर प्रशंसा केली आहे आणि हा चित्रपट पाहण्याचे आवाहन केले आहे.

राज ठाकरे यांनी ट्विट केले आहे की, ”पानिपतची लढाई ही मराठेशाहीनी हरलेली लढाई म्हणून न पाहता तो राजकीय आणि सांस्कृतिक आक्रमकांना थोपावणाऱ्या मराठ्यांच्या शौर्याचा आविष्कार होता. मनगटात प्रचंड बळ असलेली अन् अटेकापार झेंडा नेणारी मराठेशाही कुठे आणि का कमी पडली? त्यासाठीचा उपलब्ध होत असलेला ध्वनिचित्र दस्तावेज म्हणजे माझा मित्र आशुतोष गोवारीकर यांचा ‘पानिपत’ चित्रपट. प्रत्येक मराठी माणसानेच नव्हे तर तमाम हिंदुस्थानी यांनी देखील पहायला हवा.”

दरम्यान यापूर्वी राज ठाकरे यांनी ‘पानिपत’च्या ट्रेलनंतरही त्याचे कौतूक केले होते. या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर तीन वर्षांनंतर कमबॅक करत आहेत. त्यामुळे साहजिकच प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मराठमोळे संगीतकार अजय – अतुल यांनी हा चित्रपट संगीतबद्ध केला असून चित्रपटामधील गाणी आधीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत.

 

Leave a Comment