आपल्या आवडत्या वेबसीरिज पहा फ्रीमध्ये;अ‍ॅमेझॉन प्राईमनंतर आता HBO देणार फ्री सबस्क्रिप्शन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी भारत सरकारने २१ दिवसांचा लॉकडाउन जारी केला आहे. परिणामी लोक आपल्या घरातच कैद झालेले आहेत. घरात बसून कंटाळलेली लोकं आपला वेळ घालवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टीव्ही आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर करत आहेत. हेच गृहीत धरून आपल्या या प्रेक्षकांना आता आणखी चांगल्या वेब सीरिज आणि चित्रपट पाहता यावे यासाठी एचबीओ अ‍ॅपने आपली सेवा काही काळासाठी मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे.

सीएनएनने दिलेल्या एका बातमीनुसार हा नविन प्रयोग एचबीओने सध्या तरी प्रायोगिक तत्वावर सुरु केला आहे. त्यामुळे ५०० मिनिटांपर्यंत प्रेक्षक या अ‍ॅपचा मोफत आनंद घेऊ शकतात. यामुळे ‘सिलीकॉन वॅली’, ‘सिक्स फीट अंडर’, ‘द सोप्रानोस’, ‘द वायर’, ‘बॅरी’, ‘ट्रू ब्लड’ यांसारखे अनेक लोकप्रिय शो फ्रीमध्ये पाहाता येतील.

एचबीओ हे एक ऑनलाईन अ‍ॅप आहे. या अ‍ॅपवर आपण नेटफ्लिक्स किंवा अ‍ॅमेझॉन प्राईमप्रमाणेच वेब सीरिज किंवा चित्रपट पाहू शकतो. या अ‍ॅपचा वापर करण्यासाठी दर महिन्याला काही ठरावीक रिचार्ज करावा लागतो. मात्र लॉकडाउनच्या काळात या अ‍ॅपचा वापर मोफत करता येईल. यापूर्वी अशीच काहीशी सेवा ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’ व ‘झी ५’ या अ‍ॅप्सने देखील सुरु केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

Leave a Comment