सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येवर IPS अधिकाऱ्याची भावनिक पोस्ट; म्हणाले काश…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । चित्रपट अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणामुळे केवळ चित्रपटसृष्टीच नव्हे तर बिहारची आयएएस आणि आयपीएस लॉबीही हादरली आहे. बिहारचे आयपीएस विकास वैभव यांनी सुशांतसिंग राजपूत याच्याबद्दल एक अत्यंत भावनिक पोस्ट टाकली आहे, जी प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे. विकास वैभव यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, ” काय घाई होती, सुशांतसिंग राजपूत ! जरा धीर धरायचास ! उत्तर निश्चितच होतं ! पण आता काय बोलू ? बिहारच्या या अदभुत प्रतिभेच्या निधनाबद्दल मी नम्रपणे श्रद्धांजली वाहतो आहे ! मी हे आधी म्हणायला पाहिजे होते ! आयुष्याच्या प्रवासात मन विचलित करणारे क्षण नक्कीच येतील पण ते क्षणिक असतात ! धैर्य हाच त्यावरील उपाय आहे! ‘

विकास वैभव हे तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहेत
आयपीएस अधिकारी असलेले विकास वैभव यांचे पर्यावरण आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या स्थळांविषयी विशेष प्रेम आहे. त्यांना फोटोग्राफी देखील आवडते. पोलिस अधिकाऱ्यांविषयी प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट येते की ते गणवेश घालून गुन्हेगारांना पकडतात. बंदुक आणि काठ्यांसह कायदा व सुव्यवस्था राखतात. पण, लोकं कदाचित पोलिस अधिकारी हेदेखील माणसेच आहेत हे विसरतात. ते फक्त काठी मारणारे अधिकारीच नाही तर शिक्षक आणि मार्गदर्शकही बनू शकतात.

आयपीएस अधिकारी विकास वैभव यांनी पोलिसां बद्दलची हीच विचारसरणी बदलली आहे. कदाचित हेच कारण होते की त्यांनी फेसबुकवर सुशांत सिंग राजपूतबद्दल लिहिण्यापासून स्वत: ला रोखू शकले नाहीत. सध्या विकास वैभव पोलिस अधिकारी तसेच ब्लॉगर आणि ​​मार्गदर्शक म्हणून भूमिका साकारत आहेत. सध्या विकास वैभव बिहार पोलिसात डीआयजी म्हणून तैनात आहेत. विकास वैभव देखील इंटरनेटच्या माध्यमातून लोकांमध्ये चर्चेत आहेत.

सुशांतच्या मृत्यूमुळे लोकं अस्वस्थ झालेत
सुशांतसिंग राजपूत हा देखील बिहारचाच होता आणि तो येथील तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय होता. नेहमीच हसत-मुख असणाऱ्या सुशांतशी संबंधित या वृत्तावर कोणालाही विश्वास बसत नाहीये. केवळ बिहारच नाही तर देशातील बर्‍याच भागात सुशांतच्या आत्महत्येबद्दल लोक प्रश्न उपस्थित करीत आहेत. मात्र, सुशांत डिप्रेशनने झगडत असल्याचे मुंबई पोलिसांच्या तपासणीत आणि सुशांतच्या निकटवर्तीयांनी म्हटले आहे. असे असूनही सुशांतच्या मृत्यूला कोणी पचवू शकलेले नाही.

वास्तविक सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचे वृत्त समजल्यानंतर बरेच लोक अस्वस्थ झाले आहेत. बिहार आणि बिहारबाहेर वास्तव्य करणारे अनेक नोकरशहा सुशांतला श्रद्धांजली अर्पण करुन त्याच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करीत आहेत. सुशांतच्या मृत्यूमुळे हरियाणा केडरचे अनेक आयपीएस अधिकारीही दु: खी झालेआहेत. सुशांतचा मेहुणा हा हरियाणा केडरचा आयपीएस अधिकारी आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

Leave a Comment