‘अंग्रेजी मीडियम’च्या निमित्ताने इरफान खानचा भावनिक संदेश म्हणाला,मी फक्त सकारात्मकच राहू शकतो.

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात अनेक प्रकारचे चढ-उतार अनुभवल्यानंतर शारीरिक आजारपणाने जेव्हा त्रास द्यायला सुरुवात केलेली असते तेव्हा व्यक्तीला खचून जायला होतं. सोबत इतर कुणीही असलं तरी आजारपणाचा सामना हा स्वतःलाच करावा लागतो. बॉलिवूडमधील हरहुन्नरी कलाकार इरफान खानच्या बाबतीतही असाच काहीसा प्रकार समोर आला आहे.

न्यूरोएन्डोक्राइन ट्यूमर या कर्करोगाशी लढा देणाऱ्या अभिनेता इरफान खानला मागील काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर रहावं लागलं असलं तरी लवकरच तो बॉलिवूडमध्ये पुनरागमन करतोय. बहुप्रतिक्षित ‘अंग्रेजी मीडियम’ या त्याच्या चित्रपटाचा पहिला पोस्टर नुकताच प्रदर्शित झाला. या पोस्टरसोबतच इरफानने त्याच्या चाहत्यांसाठी एक खास संदेश दिला आहे.इरफानने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ‘अंग्रेजी मीडियम’च्या शूटिंगदरम्यानची क्षणचित्रे पाहायला मिळत आहेत. इरफानने स्वतःच्या आवाजात हा संदेश रेकॉर्ड करुन प्रेक्षकांपर्यंत पोहचवला आहे.

Irrfan’s Heartwarming Message to Us All | Angrezi Medium | Trailer Out Now

Leave a Comment