सलमान खानच्या ‘राधे’मध्ये जॅकीदादा दिसणार एकदम हटके लूकमध्ये,फोटोज् झाले व्हायरल..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावर्षीच्या रमजान ईदला सलमान खानचा चित्रपट ‘राधे’ प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमान खानसोबत जॅकी श्रॉफ, रणदीप हूडा आणि दिशा पाटनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाच्या सेटवरील बरेच फोटोज् व्हायरल झाले आहेत. यातील जॅकी श्रॉफचा एक फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होतो आहे. असे म्हटले जात आहे की, तो राधेमध्ये अशा लूक मध्ये दिसणार आहे.

या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये जॅकी श्रॉफने आपल्या पांढऱ्या दाढीवर चष्मा घातला आहे. त्याने तपकिरी रंगाचा सूट परिधान केलेला आहे आणि टोपी देखील घातली आहे. पण अद्यापही जॅकीच्या या लूकबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही, परंतु जॅकीच्या चाहत्यांना त्याचा हा लूक खूपच आवडलेला दिसतोय.

चित्रपटाविषयी सांगायचे झाल्यास प्रभुदेवा हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत. प्रभुदेवाने सलमान खानचा चित्रपट ‘दबंग ३’ देखील दिग्दर्शित केला आहे. येत्या वर्षांमध्ये जॅकी श्रॉफ ‘राधे’ व्यतिरिक्त रोहित शेट्टीच्या सूर्यवंशीमध्ये अक्षय कुमार आणि कतरिना कैफबरोबर दिसणार आहे.सलमान खानने २०२१ ईद चित्रपटाची घोषणा देखील केली आहे. सलमान खानचा आणखी एक चित्रपट ‘कभी ईद कभी दिवाळी ईद’ हा २०२१ मध्ये रिलीज होईल.

 

Leave a Comment