भाजपच्या आंदोलनात अभिनेत्री जुही चावला सहभागी; म्हणाली, कलाकार प्रतिक्रिया देण्याची घाई करतात

मुंबई | फ्री काश्मीर’च्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ मुंबईतील सावरकर स्मारकात भाजपने आयोजित केलेल्या आंदोलनात अभिनेत्री जुही चावला सहभागी झाली. कलाकार विषय समजून न घेता कुठल्याही विषयावर प्रतिक्रिया देण्याची घाई करतात, असं जुही माध्यमांशी बोलताना म्हणाली. मुंबई येथे जेएनयू येथे झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ झालेल्या आंदोलनात फ्री काश्मीर असे पोस्टर वापरले होते. त्याच्या निषेधार्थ भाजपने आंदोलन आयोजित केले होते.

प्रत्येक गोष्टीवर लोकांनी प्रतिक्रिया देऊ नयेत. लवकर रिअॅक्ट होण्याच्या नादात अनेक जण विषय समजून घेत नाहीत. त्यांना काही माहित नसतं, असं जुही चावला म्हणाली. कालच अभिनेत्री दीपिका पदुकोणने ‘जेएनयू’मध्ये हजेरी लावून विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. बॉलिवूड सेलिब्रिटी भूमिका घेणं टाळत असल्याचं म्हटलं जात असताना सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका अभिनेत्रीने भूमिका घेतली आहे. कालच अभिनेत्री दीपिका पदुकोण जेएनएयू येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनात सहभागी झाली होती.

काय आहे प्रकरण?

दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हिंसाचाराविरोधात मुंबईत मोठ्या प्रमाणात निदर्शनं सुरु आहेत. यामधील एक पोस्टर सोशल मीडियावर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर ‘फ्री काश्मीर’ असं लिहिलं होतं. भाजपने याविरोधात शिवाजी पार्कजवळ सावरकर स्मारकात निषेध आंदोलन केलं.

महाराष्ट्रच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकिंग बातम्या थेट तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 8080944419 या नंबरवर WhatsApp करा आणि लिहा Hello News

हे पण वाचा –

राजपुत्र अमित ठाकरे उतरणार सक्रिय राजकारणात !

वेदनादायक ! ऑस्ट्रेलियातील महाभयानक आगीत ४८ कोटी वन्यजीवांचा होरपळून मृत्यू

‘या’ कारणामुळं दीपिका निर्भयाच्या पालकांना भेटण्याऐवजी जेएनयूत गेली; विवेक अग्निहोत्रीने केला गौप्यस्फोट

ऑस्ट्रेलियातील आगीत एका कुटुंबाने वाचवले तब्बल ९० हजार प्राण्यांचे जीव

जेनेलिया आणि रितेशची जंगल सफारी, पहा व्हिडिओ

Get real time updates directly on you device, subscribe now.

x Close

Like Us On Facebook

WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com