इतकीचं अडचण होत असेल तर कंगनाने बॉलीवूड सोडावं- करण जोहर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून अभिनेत्री कंगना रानौत बॉलिवूडमधील घराणेशाहीला सतत विरोध करताना दिसत आहे. याप्रकरणी दिग्दर्शक करण जोहर सोबत इतर काही जणांवर कंगना सतत सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत आहे. दरम्यान करण जोहरचा एक व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये करण जोहरचा कंगनावर असलेला संताप स्पष्ट झळकत आहे.

‘कंगनाने प्रत्येकवेळी असं भासवलं आहे की तिच्यावर इंडस्ट्रीमध्ये कायम अन्याय होत आला आहे. असं असेल तर तिने खुशाल कलाविश्वाला रामराम ठोकावा. कोणीही तिला थांबवणार नाही.’ असं वक्तव्य करण जोहरने केलं आहे. दरम्यान, सध्या सुशांतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये वादळ आलेलं आहे. १४ जुन रोजी सुशांतने अखेरचा श्वास घेतला. मात्र त्याच्या आत्महत्येमागील रहस्य अद्याप उलगडलेलं नाही. याप्रकरणी आतापर्यंत ३५ पेक्षा जास्त जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मात्र, सुशांत मृत्यू बॉलिवूडमधील घराणेशाहीमुळे झाल्याचं सांगत कंगना रानौतने करण जोहरवर हल्लाबोल करत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment