नाशिकबॉलिवुड

करिना, करिश्माकडून बाळ येशूचे दर्शन

नाशिक प्रतिनिधी | भिकन शेख

प्रसिद्ध अभिनेत्री करिना कपूर, तिची बहिण करिश्मा कपूर आणि त्यांची आई तथा जुन्या जमान्यातील प्रसिद्ध अभिनेत्री बबिता कपूर यांनी शनिवारी नाशिकरोड येथील बाळ येशूचे दर्शन घेतले. त्यांची ही खासगी भेट असल्याने त्याबाबत गुप्तता पाळण्यात आली होती. तरीही त्यांना पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी उसळली होती. चर्चच्या सूत्रांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

कपूर कुटुंबीय सकाळी विमानाने मुंबईहून ओझर येथे आले. तेथून खासगी वाहनाने अकरा वाजता नाशिक-पुणे महामार्गावरील सेंट झेविअर्स शाळेत ते आले. त्यानंतर करिना, करिश्मा, बबिता कपूर, तसेच करिश्मा यांची मुले आणि मित्र यांनी बाळ येशूचे मनोभावे दर्शन घेतले.

फादर ट्रेव्हर मिरांडा यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. फेब्रुवारीत येथे तीन दिवस यात्रा भरते. तिला म्हणजे देश-विदेशांतून भाविक येतात, अशी माहिती फादर मिरांडा यांनी कपूर कुटुंबाला दिली. कपूर कुटुंबीयांच्या आगमनाचे वृत्त समजताच येथे चाहत्यांची गर्दी उसळली होती. चर्चचा कर्मचारीवर्ग आणि सुरक्षारक्षक यांना चाहत्यांना आवरणे अवघड झाले होते.

  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  
  •  

ताज्या बातम्या

1
2
3
4
5
6
7
8
x Close

Like Us On Facebook

shares