कुणाल कामरा काही अर्णबचा पिच्छा सोडेना!प्रवासबंदीनंतर कामराने केली अर्नबच्या ऑफीसबाहेर पोस्टरबाजी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एका विमान प्रवासात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी आक्षेपार्ह वर्तन केल्याप्रकरणी ‘स्टॅण्डअप कॉमेडियन’ कुणाल कामरा याच्यावर चार विमान कंपन्यांनी प्रवासबंदी घातली आहे. या प्रकरणाचे पडसाद समाजमाध्यमांत उमटल्यानंतर दोन गट पडल्याचे चित्र दिसत आहे. एका बाजूला कुणाल कामराचे समर्थन करणारे तर दुसरीकडे विरोध करणारे असे दोन गट दिसून येत आहे. दरम्यान, कुणाल कमरा काही अर्णबचा पिच्छा सोडायला काही तयार नाही आहे.

अर्णबच्या वाहिनीच्या ऑफिसच्या बाहेर कुणाल कामराने एका पोस्टरवर खास अर्णबसाठी संदेश लिहत आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. याबाबतची एक पोस्ट कुणालने आपल्या फेसबुक पेजवरून पोस्ट केली आहे. सध्या ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या पोस्टरमध्ये कुणालनं लिहलं आहे,” अर्णब, मला तुला फक्त इतकं सांगायचं आहे मी तुझी माफी मागणार नाही”. या पोस्टनंतर सोशल मीडियावर अनेक मतमतांतरं पाहायला मिळत आहे.

https://www.facebook.com/kunalkamra88/posts/1297587117100470

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

हे पण वाचा-

महाराष्ट्रातून धावणार आणखी दोन बुलेट ट्रेन; दोन नवीन मार्गांचा प्रस्ताव सादर

सर्वसामन्यांना बसणार महागाईची झळ! गॅस सिलिंडर १०० ते १५० रुपयांनी महागणार?

आता ट्रेनमध्ये खाली बर्थसाठी टीटीईच्या मागे हेलपाटे मारण्याची गरज नाही; रेल्वेने सुरू केली ‘ही’ नवीन सेवा

Leave a Comment