दहीहंडीला कोटींची पारितोषिकं देणाऱ्या राजकारण्यांनी यंदा या “थराला” जाऊन काम करावंच!- केदार शिंदे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । कोरोना महामारीमुळे सर्व सणांवर मर्यादा आली आहे. आज तर दहीहंडी.. मात्र सगळ्या गोविंदा मंडळांमध्ये शुकशूकाट पाहायला मिळत आहे. कोटी रूपयांची पारितोषिकं जाहीर करणारे राजकारणी मंडळी देखील आज शांत आहेत. तेव्हा या वर्षी राजकारणी मंडळी गोविंदा मंडळात ती रक्कम का वाटत नाहीत असा प्रश्न दिग्दर्शक केदार शिंदे यांनी उपस्थित केला.

केदार शिंदे ट्विट करत म्हणाले की, ‘या वर्षी दहीहंडी नाही. कुठलेच सण साजरे करता येत नाहीत. पण कोटी कोटीची पारितोषिकं दरवर्षी जाहीर करणारे राजकारणी , या वर्षी ती रक्कम गोविंदा मंडळात का वाटत नाहीत? या वर्षी त्यांनी या ‘थराला’ जाऊन काम करावंच! ‘ असं ते म्हणाले. मुंबईच्या इतिहासात दहीहंडी हा अविभाज्य घटक आहे. आधी केवळ उत्सव म्हणून साजरा होणार दहीहंडीचा कार्यक्रम नंतरच्या काळात स्पर्धा म्हणून पुढे आला. स्पर्धा आली म्हणजे पारितोषिकं आली. आणि या पारितोषिकासाठी नवे- नवे प्रायोजक मैदानात उतरले उतरले. यात राजकारणी सर्वात अग्रभागी.

मात्र, कोरोनामुळे दहीहंडीवर विरझणं पडलं. खबरदारीचा उपाय म्हणून यंदा दहीहंडीचा उत्सव साजरा न करण्याचा निर्णय मंडळांनी घेतला. याचा नाईलाजानं फाटका पारितोषिक पटकावण्यासाठी वर्षभर तयारी करणाऱ्या गोविंदा पथकांना बसला आहे. त्यामुळं यंदाच्या वर्षी राजकारणी मंडळी गोविंदा मंडळात पारितोषिकाची रक्कम या गोविंदा पथकांना का वाटत नाहीत असं मत दिग्दर्शक केदार शिंदे यांनी व्यक्त केलं आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment