‘त्या’ गाण्याचं नरेंद्र मोदींनी ही केलं कौतुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन l देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे देशभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था थांबली आहे. यामुळे अनेक नागरिक बेरोजगार झाले आहेत. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अनेक नागरिक आपल्या मूळ गावापासून लांब शहरात अडकून पडले आहेत.तर काही नागरिक हे आपल्या गावी पायी जात आहेत. मात्र अशा परिस्थितीत देशातील लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार करण्यासाठी लोकप्रिय गायकांनी एकत्र येत एक गाणं बनवलं आहे. भारताच्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी हे गाणं ट्विट केलं आहे. तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या गाण्याची स्तुती केली आहे.

हे गाणं प्रत्येकाला प्रेरित करणारे आणि प्रत्येकामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण करणारे आहे. या गाण्यामध्ये स्वयंपूर्ण भारताचा जयघोष करणारे स्वर आहेत. असे ट्विट पंतप्रधान मोदी यांनी केलं आहे.

‘वन नेशन वन वॉइस- जयतु जयतु भारतम’ असे या गाण्याचं नाव आहे. कोरोना च्या कठिण परिस्थितीत लोकांमधील उत्साह कायम ठेवण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं आहे. नमस्कार आमच्या २११ कलाकारांनी एकत्र येत स्वावलंबी भारताच्या भावनेतून प्रेरित होऊन या गाण्याची निर्मिती केली आहे. हे गाणं सर्व भारतीयांना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही अर्पण करत आहोत. असे ट्विट लता मंगेशकर यांनी केलं आहे.

Leave a Comment