पानिपत पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात …

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । पानिपत हा चित्रपट ट्रेलर रिलीज झाल्यापासून चर्चेत आला आहे. बरेच लोक चित्रपटाविषयी निषेधही करत आहेत. त्याचबरोबर हा चित्रपट एका नव्या वादात अडकलेला दिसत आहे. यामुळे चित्रपटाच्या निर्मात्यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

पेशवा बाजीरावांच्या वंशजांनी असा दावा केला आहे की, आशुतोष गोवारीकर यांच्या आगामी ‘पानीपत’ या चित्रपटामध्ये दिग्गज मराठा सेनापती आणि त्यांची दुसरी पत्नी मस्तानी यांचे अपमानास्पद वर्णन केले आहे. चित्रपटाविरोधात आपण कोर्टात फिरणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. भोपाळमध्ये राहणाऱ्या पेशवा बाजीराव यांचे आठव्या पिढीचे वंशज नवाबजादा शादाब अली बहादूर यांनी सुनीता गोवारीकर आणि रोहित शेलटकर आणि दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर या चित्रपटाच्या निर्मात्यांना विशेष संवादावर नोटीस दिली आहे.

Panipat | Official Trailer |Sanjay Dutt, Arjun Kapoor, Kriti Sanon|Ashutosh Gowariker|In Cinema Now

या चित्रपटाच्या रिलीज झालेल्या ट्रेलरमध्ये अभिनेत्री कृती सॅनॉन पार्वतीबाई म्हणून बोलताना दिसत आहे. त्यामध्ये ती म्हणते, ‘मी ऐकलं आहे की जेव्हा पेशवा एकट्या मोहिमेत जातो तेव्हा तो मस्तानी घेऊन परत येतो.’ या संवादामुळे मस्तानी आणि पेशवा बाजीरावांचा अपमान झाल्याचे त्यांच्या वंशजांना वाटते.

Leave a Comment