प्रियंकाने साजरा केला हटक्या अंदाजात पहिला ‘करवा चौथ’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

बॉलीवुड खबर । भारत देशात सण-उत्सव यांना खुप महत्त्व असत व ही सर्व सण खूप उत्साहाने साजरे देखिल केले जातात. जेव्हा हे सण साजरे होतात तेव्हा त्यात बॉलीवुडही ही काही मागे नसते. कालचा करवा चौथ सण तर बॉलिवूड अभिनेत्री मोठ्या थाटामाटात साजरे करतात.

मग पहिली करवा चौथ साजरी करणारी देसी गर्ल प्रियंका चोप्रा कशी मागे राहू शकते…? प्रियंका चोप्राची ही पहिली करवा चौथ होती आणि तिने स्वत: चे एक चित्र तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते, ज्यात एका नवीन वधू सारखी ती दिसत आहे. तिने सांगितले आहे की ती लॉस एंजेल्समध्ये तिचा पहिला करवा चौथ साजरा करीत आहे. निकने देखिल आपल्या ट्विटर वरुन ह्या सणांचे फोटो शेयर केले आहेत.

निक जोन्सने आपल्या ट्विटर वर पुढील प्रमाणे या सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, “माझी पत्नी भारतीय आहे. ती हिंदू आहे आणि ती प्रत्येक प्रकारे अविश्वसनीय आहे. तिने मला तिची संस्कृती आणि धर्म याबद्दल बरेच काही शिकवले आहे. मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि त्याचे कौतुक करतो आणि आपण पाहू शकता की आम्ही एकत्र मजा करतो. सर्वांना करवा चौथ हार्दिक शुभेच्छा!’


इतरही काही सेलिब्रेटी यांनी आपले फोटो शेयर केले आहेत…..



Leave a Comment