शकुंतला देवीमधील ‘रानी हिंदुस्तानी’ गाणं प्रदर्शित; पहा विद्याचा नवीन लुक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | विविध भूमिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री विद्या बालन लवकरच ‘शकुंतला देवी’ या आगामी चित्रपटात झळकणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटातील पास नहीं तो फेल नहीं हे गाणं प्रदर्शित झालं होतं. त्यानंतर आता या चित्रपटातील दुसरंही गाणं प्रदर्शित झालं आहे.

शकुंतला देवी’ या चित्रपटातील ‘रानी हिंदुस्तानी’ हे दुसरं गाणं नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. विशेष म्हणजे या गाण्यातून शकुंतला देवी यांच्या स्वभावातील खेळकर वृत्तीचं दर्शन होतं. तसं विद्यानेदेखील तिच्या देहबोली, चेहऱ्यावरील हावभाव यांचा सुंदरित्या वापर केल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यात शकुंतला देवींचा एकंदरीत स्वभाव दिसून येतो

Rani Hindustani - Shakuntala Devi | Vidya Balan | Sunidhi Chauhan | Sachin - Jigar | Vayu|

सुनिधी चौहानच्या आवाज स्वरबद्ध झालेलं हे गाणं सचिन-जिगर या जोडीने कंपोज केलं आहे. तर प्रसिद्ध गीतकार वायू यांनी लिरिक्स दिल्या आहेत. या गाण्यात या चित्रपटात ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्रा विद्याच्या मुलीची भूमिका साकरत आहे. त्यासोबतच जिशू सेनगुप्ता आणि अमित साध यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘शकुंतला देवी’ हा चित्रपट येत्या ३१ जुलै रोजी अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा.

ब्रेकिंग बातम्यासाठी : www.hellomaharashtra.in

Leave a Comment