सुशांतच्या आयुष्यापासून प्रेरित असलेला ‘सुसाइड किंवा मर्डर’ या चित्रपटाचे पहिले पोस्टर प्रदर्शित

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूतने 14 जून रोजी मुंबईत घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिस तपास करत आहेत. त्याचवेळी सुशांतच्या आयुष्यापासून प्रेरित असा ‘सुसाइड किंवा मर्डर’ या चित्रपटाचे पोस्टर समोर आले आहे. चित्रपटाचे निर्माता विजय शेखर गुप्ता यांनी नवभारतटाइम्स ऑनलाईनशी या चित्रपटाविषयी बोलले आहे.

विजय शेखर गुप्ता म्हणाले, ‘चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या जवळपास 50 टक्के काम पूर्ण झाले आहे आणि ऑगस्टच्या मध्यापर्यंत त्याचे अंतिम रूप देण्यात येईल. 16 सप्टेंबरपासून आम्ही मुंबई आणि पंजाबमध्ये 50 दिवस शूट करणार आहोत. बॉलिवूडमध्ये पसरलेल्या नेपोटिझम आणि बॉलिवूड माफियांच्या मिथकांना वाचा फोडण्यासाठी हा चित्रपट तयार केला जात आहे.

प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सचिन तिवारी दिसत आहे. उत्तर प्रदेशच्या रायबरेली येथे राहणारा सचिन तिवारी ‘सुसाइड किंवा मर्डर’ चित्रपटात काम करत आहे. सचिन तिवारी हा अगदी सुशांतसिंग राजपूत यांच्या सारखा हुबेहूब दिसतोय त्याचमुळे सध्या तो इंटरनेट वर चांगलाच गाजतोय

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment