बहुचर्चित ‘धुरळा’ या मराठी सिनेमाचा टीजर प्रदर्शित 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । एकीकडे राज्यामध्ये सत्ता स्थापनेवरून राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच सुरु असताना काही दिवसांपूर्वी मराठी कलाकारांच्या ट्विटरवरील एका वेगळ्या भूमिकेमुळे सर्वत्र चांगलीच चर्चा रंगली होती. मराठी चित्रपटसृष्टीमधील बडे कलाकार असलेले सई ताम्हणकर , अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी अशा अनेक कलाकारांनी ‘#पुन्हानिवडणूक?’ असं लिहून ट्विट केलं होत. मराठीतील हे मोठे कलाकार अचानक हा हॅशटॅग का वापरत आहेत असा प्रश्न चाहत्यांना पडला. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि सत्तापेच लक्षात घेता हे कलाकार काहीतरी राजकीय भाष्य करत आहेत असं अनेकांना वाटलं.

DHURALA - OFFICIAL TEASER | धुरळा | Ankush| Siddharth| Saie| Sonalee| Amey| Prasad Oak | Sameer V

मात्र आता ‘हव्वा कुनाची रं?’… ‘हव्वा आपलीच रं!’ असं म्हणत दिग्दर्शक समीर विध्वंस यांनी या सर्वांची उत्तरे दिली आहेत. त्यांच्या आगामी ‘धुरळा’ चित्रपटाच्या टीजर रिलीज च्या आधी करण्यात आलेली हि प्रसिद्धी होती. आज या चित्रपटाचा टीजर सर्वत्र रिलीज झाला. अल्का कुबल, सई ताम्हणकर, सोनाली कुलकर्णी, प्रसाद ओक, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव, उमेश कुलकर्णी, अमेय वाघ अशी मराठी चित्रपटसृष्टीतील जबरदस्त तगडी स्टारकास्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दिसते आहे. गावाकडच्या मातीत मुरलेलं राजकारण, निवडणुकांची रणधुमाळी आणि या सत्तेच्या या खेळात एकमेकांवर कुरघोडी करताना उडालेला राजकारणाचा ‘धुरळा’ हे सगळेच पैलू या टीझरमध्ये उलगडण्यात आले आहेत. त्यामुळे आता चित्रपटात काय पाहायला मिळतंय याची उत्सुकता ताणली गेली आहे. ३ जानेवारी २०२० मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. दरम्यान क्षितीज पटवर्धन यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे.

 

Leave a Comment