ABCD ३ साठी वरून ची २१ करोड ची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

फिल्मी दुनिया | वरून धवन आणि कॅटरिना अशी स्टार जोडी ने काम केलेला ABCD 3 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटासाठी वरुन ने २१ करोड रुपयांची डीमांड केली असल्याचं बोललं जात आहे.

बिग बजेट मधे मोडल्या जाणार्या ABCD 3 चित्रपटाचं दिग्दर्शन रेमो डिसूझान यांनी केले आहे. चित्रपटासाठी वरूनन 21 करोड ची मागणी केल्याचं बाॅलिवूडच्या वर्तुळात बोललं जात आहे. विशेष म्हणजे वरुणची ही डिमांड दिग्दर्शकांकडून पूर्ण झाली असल्याचं समजत आहे.

स्टार प्लस वर सुरू असलेला ‘डान्स प्लस’ चा चौथा सीजन जोरात सुरू आहे. त्यातच डान्स च्या दिवाण्यांवर राज्य करणारा रेमो डिसूझा अनेकांच्या घराघरात या शो च्या माध्यमातून पोहचला आहे. ABCD च्या तिसऱ्या सीरिज मध्ये ही वरून झळकणार असून याआधी ही त्याने abcd 2 मध्ये काम केलं आहे. त्यामुळे रेमो आणि वरूनच समीकरण चांगलच आहे.

ABCD चित्रपट 4D मध्ये शूट होणारा भारतातील पहिला सिनेमा ठरणार अाहे. तसेच वरूण आणि कतरीना यानिमित्ताने पाहिल्यानंदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. चित्रपटामधे त्यांच्यासोबत धर्मेश, राघव आणि पुनीतसुद्धा पाहायला मिळणार आहेत. मिळालेल्या सूत्रानुसार ABCD चं शूटिंग २०१९ च्या जानेवारी पासून सुरू होणार आहे. सिनेमामध्ये ५ गाणी असणार आहेत.

Leave a Comment