Monday, February 6, 2023

ओटीटीवर लागणार कॉमेडीचा तडका; ‘हंगामा 2’ होणार लवकरच प्रदर्शित

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण राज्यात कोरोना महामारीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सरकारने सर्वत्र कडक नियमांचे साखळदंड घातले आहेत. इतकेच नव्हे तर राज्यात कडक लॉकडाऊन देखील आहे. परिणामी राज्यातील सर्व थिएटर आणि चित्रीकरण पूर्णपणे बंद आहेत. या महामारीमुळे आगामी चित्रपटांच्या कमाईवर मोठा परिणाम होत आहे. यासाठी अनेक निर्मात्यांनी आपल्या चित्रपटांच्या रिलीजच्या तारखा लांबणीवर टाकल्या तर काहींनी आपले चित्रपट ओटीटी डिजिटल प्लॅटफॉर्मवर रिलीज केले. यात सलमान खानचा राधे चित्रपट देखील होता. त्यात आता ‘हंगामा २’ या कॉमेडी चित्रपटाचीही ओटीटीवर वर्णी लागणार आहे.

- Advertisement -

बॉलिवूडचा आगामी चित्रपट ‘हंगामा’चे अधिकृत हक्क डिस्ने प्लस आणि हॉटस्टारला ३० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. यामध्ये सॅटेलाइट हक्कांचा कोणत्याही पद्धतीने समावेश नाही. शिवाय टीव्ही प्रिमियरच्या हक्कांची एकूण रक्कम अद्याप समजू शकलेली नाही आहे. मात्र ही रक्कम अंदाजे ३६ कोटी असल्याचे सांगितले जात आहे. ‘हंगामा २′ ओटीटी प्लॅटफॉर्मवर कधी रिलीज होणार आहे, हे देखील अजून समजू शकलेले नाही. निर्मात्यांकडून अद्याप या व्यवहारावर अधिकृतरीत्या शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र चित्रपटाविषयी उठणाऱ्या वावटळातून इतकीच माहिती मिळत आहे कि, हा चित्रपट ओटीटीवरच प्रदर्शित होणार आहे.

‘हंगामा २′ हा एक हलकीफुलकी कॉमेडी असणारा मजेशीर चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट कुटुंबासोबत पाहून एन्जॉय करता येईल असा आहे. इतकेच नव्हे तर सर्व वयोगटातील प्रेक्षकांना त्याचा आनंद घेता येणार आहे. या चित्रपटात शिल्पा शेट्टी, परेश रावल, आशुतोष राणा, मनोज जोशी, राजपाल यादव, जॉनी लिव्हर आणि टिकू तलसानिया या कलाकारांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या कलाकारां व्यतिरिक्त अक्षय खन्नाही छोट्या भूमिकेत दिसणार आहेत. शिल्पा शेट्टी बऱ्याच दिवसांनंतर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करत आहे. परेश रावल आणि शिल्पा शेट्टीची ही जोडी बघायला प्रेक्षकांना नक्कीच मजा येईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.