विद्या बाललने मंत्र्याला डिनरसाठी म्हटलं नाही! सिनेमाचे शूटिंग केलं बंद

मुंबई । बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या आगामी ‘शेरनी’ या चित्रपटाचं सध्या मध्य प्रदेशमध्ये चित्रीकरण सुरु आहे. मात्र, अचानकपणे हे चित्रीकरण अर्ध्यावर थांबवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे वनमंत्री विजय शाह नाराज झाल्यामुळे हे चित्रीकरण थांबवण्यात आल्याचं ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी वनमंत्री विजय शाह यांनी विद्या बालनला डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. मात्र, विद्याने हे आमंत्रण स्वीकारलं नाही. त्यानंतर अचानकपणे तिच्या चित्रपटाचं चित्रीकरण थांबवण्याचे आदेश देण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. यामध्येच विजय शाह नाराज झाल्यामुळे त्यांनी हे चित्रीकरण बंद करण्यास सांगितल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, विजय शाह यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत.

अलिकडेच शेरनी चित्रपटाची टीम चित्रीकरणासाठी जंगलामध्ये चित्रीकरणासाठी जात होती. मात्र, बालाघाटमधील जिल्हा विनाधिकाऱ्यांनी प्रोडक्शनच्या गाड्या वाटेत अडवून केवळ दोन गाड्या जंगलात जाऊ शकतात असं सांगितलं.

विजय शाह यांनी फेटाळलं डिनरचं वृत्त
विजय शाह यांनी वरील आरोप फेटाळले असून चित्रपटाच्याच टीमकडून मला जेवणाचं आमंत्रण मिळालं होतं. मात्र, मीच ते नाकारलं असं म्हटलं आहे. “ज्यावेळी या लोकांनी माझ्याकडे चित्रीकरणासाठी परवानगी मागितली त्यावेळी मी बालाघाटमध्ये होतो. त्यावेळी त्यांनी मला लंच आणि डिनरसाठी आमंत्रण दिलं होतं. जे मी नाकारलं होतं. मी महाराष्ट्रात गेल्यावर त्यांची भेट घेईन. आता नाही. तसंच मी त्यांच्यासोबत जेवण करण्यास नकार दिला होता. चित्रीकरणाला नाही”, असं विजय शाह म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

You might also like