बॉलिवूड जगतातील दिग्गजांची ओटीटी प्लॅटफॉर्मकडे धाव; वेब सीरिजच्या माध्यमातून करणार प्रेक्षकांचे मनोरंजन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने कहर केला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यात आले आहे. परिणामी या पार्श्वभूमीवर सगळीच चित्रपटगृहे बंद आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी आणि कलाकारांनी आपल्या मनोरंजनासाठी डिजिटल माध्यमांकडे अर्थात ओटीटी प्लॅटफॉर्मकडे धाव घेतली आहे. या वर्षी बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकार मंडळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करणार आहेत अशी माहिती मिळत आहे. मुख्य म्हणजे यात माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, शाहिद कपूर आणि अक्षय खन्ना यांसारख्या दिग्गज कलाकारांचा समावेश आहे.

https://www.instagram.com/p/CL9sMIapgRl/?utm_source=ig_web_copy_link

बॉलिवूडची धक धक गर्ल म्हणजेच अभिनेत्री माधुरी दीक्षितदेखील डिजिटल माध्यमात पदार्पण करतेय, हे ऐकून जरा नवल वाटेल खरं. पण हेच सत्य आहे. ती ‘फाइंडिंग अनामिका’ नावाच्या एका रंजक वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. तिची ही पहिलीच वेबसिरीज असून तिने ‘फाइंडिंग अनामिका’चा फर्स्ट लूक नुकताच आपल्या चाहत्यांसह शेअर केला आहे. नेटफ्लिक्सच्या या सिरीजमध्ये माधुरी दीक्षितसोबत सोबत संजय कपूर, मानव काैर हे कलाकारदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

https://www.instagram.com/p/CL9DxCnhptW/?utm_source=ig_web_copy_link

तर बॉलिवूडचा सिंघम अर्थात अभिनेता अजय देवगण ‘रुद्रा’ या वेबसीरिजमधून ओटीटी प्लॅटफॉर्मवर ग्रँड, जोरदार पदार्पण करणार आहे. ही वेबसिरीज हॉटस्टारवर प्रेक्षकांसाठी प्रदर्शित होणार असल्याची बातमी मिळत आहे. हि वेब सिरीज एका ब्रिटिश सिरीजचा हिंदी रिमेक आहे. ‘लुथर’ नामक ब्रिटिश सिरीजचा ‘रुद्रा’ हिंदी रिमेक असून ती एक सायकोलॉजिकल ड्रामा सिरीज आहे. त्यामुळे अजय देवगणच्या चाहत्यांसाठी हि वेब सिरीज नक्कीच फुल्ल एंटरटेनमेंट असणार हे नक्की.

https://www.instagram.com/p/CN4CwT9AQb3/?utm_source=ig_web_copy_link

याशिवाय बॉलिवूड अभिनेता शत्रुघन सिन्हा यांची लेक अभिनेत्री सोनाक्षी सिन्हादेखील ओतिती प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सोनाक्षी सिन्हाची ‘फॉलन’ ही वेबसिरीज तिच्या चाहत्यांसाठी लवकरच येणार आहे. मुख्य म्हणजे या वेब सिरीजमध्ये सोनाक्षी एका डॅशिंग पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी आणि तिच्या चाहत्यांसाठी हि वेबसिरीज नक्कीच खास असणार आहे.

 

https://www.instagram.com/p/CMHiJ0xFurC/?utm_source=ig_web_copy_link

 

तर या कलाकारांव्यतिरिक्त अभिनेता शाहिद कपूरदेखील अॅमेझॉन प्राईमची वेबसिरीज करणार आहे, अशी जोरदार चर्चा आहे. म्हणजे शाहिद कपूर देखील चाहत्यांसाठी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर उतरणार आहे. अद्याप त्याच्या या वेबसिरीजचे नाव अजूनतरी निश्चित झालेले नाही. पण नक्कीच काहीतरी खास, हटके आणि दमदार घेऊन तो आपल्या चाहत्यांसाठी येईल अशी आशा आहे.

https://www.instagram.com/p/CN5BULiLaBB/?utm_source=ig_web_copy_link

तर अभिनेता अक्षय खन्ना एका मोठ्या काळाच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांच्या भेटीस येण्याकरिता सज्ज आहे. हा अभिनेतादेखील डिजिटल पदार्पणातुन आपल्या प्रेक्षकांना सुखद आनंद देणार आहे. तो ‘लेगेसी’ नामक वेब सीरिजच्या माध्यमातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर एन्ट्री करतोय. इतकेच नव्हे तर अक्षयच्या ‘लेगेसी’ या वेबसिरीजचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. त्यातील काही भागांचे शूटिंग लॉकडाऊनमुळे थांबविण्यात आले आहे.

Leave a Comment