ब्राझीलच्या राष्ट्रपतींना कोरोनाची लागण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्राझीलचे राष्ट्रपती जेयर बोलसोनारो हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सोमवारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. फुफ्फुसाचा एक्सरे काढल्यानंतर त्यांची ही चाचणी करण्यात आली होती. त्यांना कोरोनाची कोणती लक्षणे आहेत असे त्यांनी सांगितले नव्हते. पण ब्राझीलच्या राष्ट्रपती कार्यालयाने एका मुलाखतीत मंगळवारी अहवाल येतील अशी माहिती दिली होती. या चाचणी आधी बोलसोनारो स्वतः स्वस्थ असल्याचे सांगत होते.

ब्राझील च्या सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये बोलसोनारो यांचा  कोविड-१९ चा अहवाल सार्वजनिक केला होता. त्यांच्या तीनही अहवालांमध्ये त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले नव्हते. दरम्यान ब्राझीलमध्ये साडेदहा लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. ज्यामध्ये ६५ हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यादरम्यान ब्राझील च्या अमेझॉन वर्षावन आणि रिओ द जेनेरिओ च्या महानगरांमध्ये ड्यूक डे काक्सियासमध्ये खाजगी शाळा एकदा सुरु करण्यात आल्या होत्या. कोरोनाच्या या प्रकोपानंतर असे करणारे हे पहिले शहर होते. देशातील खाजगी शाळा संघ ‘फेनेप’ यांनी अमेझॉनचे गव्हर्नर आणि ड्यूक डे काक्सियास चे महापौर यांनी परवानगी दिल्याचे सांगितले आहे. इतर शहरात अजून शाळा उघडल्या नाहीत.

Leave a Comment