Saturday, March 25, 2023

सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या वार्तांकनावरून मुंबई हायकोर्टाने प्रसार माध्यमांना दिली तंबी, म्हणाले..

- Advertisement -

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या प्रसार माध्यमांच्या वार्तांकनावर आज उच्च न्यायालयानं बोट ठेवतं तंबी दिली. ८ माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं माध्यमांना संयम ठेवण्यास बजावलं आहे.

३१ ऑगस्ट रोजी ८ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. “या प्रकरणाचा तपास नैतिकदृष्ट्या, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठ केला जावा. तसंच वार्तांकन हे पोलीस किंवा अन्य लोकांच्या विरोधात मोहिमेसारखं बदलू नये,” असं याचिकाकर्त्यांनी नमूद केलं होतं. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सुशांत सिंह प्रकरणी वार्तांकन करताना माध्यमांनी संयम ठेवावा. तसंच तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही अशा प्रकारे वार्तांकन करावं, असं न्यायालयानं सुनावणी दरम्यान प्रसार माध्यमांना दटावलं.

- Advertisement -

राज्यातील माजी डीजीपी एम.एन.सिंग, पी.एस. पसरिचा, डी.के.सिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर, के.सुब्रमण्यम, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी.एन. जाधव आणि माजी अतिरिक्त डीजीपी के.पी.रघुवंशी यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवली. सीबीआयकडे चौकशी सोपवल्यानंतर या प्रकरणी अनेक नवी माहिती समोर आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.