जुगार अड्ड्यावर छापा : 8 जण ताब्यात तर 1 लाख 68 हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

सातारा येथील बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सायळी गावात तीन पानी जुगार अड्ड्यावर बोरगाव पोलिसांनी छापा टाकला. या छापेमारीत पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण 1 लाख 68 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सायली गावात गेल्या काही दिवसांपासून जुगाराचा अड्डा भरत होता. त्याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकला. यावेळी त्या ठिकाणी काही लोक जुगार खेळत असताना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करत बोरगाव पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम 12 अ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात जुगारातील रोख रक्कम 3 हजार 950 रुपये, 15 हजार रुपये किंमतीचे 6 मोबाईल, 1 लाख 50 हजार रुपये किंमतीच्या 3 दुचाकी असा एकूण 1 लाख 68 हजार 950 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.