व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

मित्रांसोबतची मस्ती आली अंगलट ! तरुणाचा अचानक गेला तोल; ट्रेन आली आणि….

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – कांदिवली रेल्वे स्थानकावर (kandivali railway station) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये कांदिवली रेल्वे स्थानकावर (kandivali railway station) मित्रांसोबत मस्ती करणं एका मुलाला प्रचंड महागात पडलं आहे. फलटावर मित्रांसोबत मस्ती करताना या मुलाचा रेल्वे रुळावर तोल गेला आणि मागून येणाऱ्या लोकल ट्रेनची त्याला धडक लागली आणि तो ट्रेनखाली आला. हि संपूर्ण घटना कांदिवली स्टेशनवर (kandivali railway station) असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कांदिवली रेल्वे स्थानकावर (kandivali railway station) घडलेली ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेल्वे स्थानकावर नेहमीप्रमाणे वर्दळ असल्याचं स्पष्ट दिसत आहे. या दरम्यान दोन मुलं ही फलाटावर मस्ती करतात. यापैकी एका जणाचा तोल फलाटावरुन खाली रेल्वे रुळाच्या दिशेला जातो. विशेष म्हणजे याचवेळी या मुलाच्या पाठीमागून लोकल ट्रेन येते. त्यामुळे या मुलाची रेल्वेला जोरदार धडक लागते. यावेळी मुलाच्या आजूबाजूने जाणाऱ्या प्रवाशांना मोठा धक्का बसतो. नेमकं काय घडलं ते कोणालाच समजत नाही.

सर्वसामान्यपणे फलाटावर (kandivali railway station) वर्दळ आहे आणि अचानक एक मुलगा मजामस्तीत फलाटाच्या खाली तोल जावून पडतो आणि नेमकं त्याचवेळी त्याच्या पाठीमागून ट्रेन येते. या मुलाला वाचवण्यासाठी मोटरमन किंवा इथर कुणाला कोणतीही संधी मिळत नाही. या घटनेप्रकरणी बोरिवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?