प्रेयसीच्या वडिलांनी तलवार दाखवत प्रियकराला धमकी दिल्याने प्रियकराने उचलले ‘हे’ पाऊल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूर जिल्ह्यमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये फराकटेवाडी या गावात एका युवकाने विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या वडिलांनी घरी येऊन तलवारीच्या धाकाने जीवे मारण्याची धमकी दिल्याने प्रियकराने घाबरून विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी प्रेयसीच्या वडिलांवर गुन्हा दाखल करून प्रेयसीच्या वडिलांना अटक केली आहे. मुरगुड पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

काय आहे प्रकरण
आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव अभिजित फराकटे असे आहे. त्याचे गावातील एका मुलीसोबत प्रेमप्रकरण सुरु होते. याची माहिती त्या मुलीच्या वडिलांना समजली. यानंतर त्या मुलीच्या वडिलांनी थेट अभिजितच्या घरात घुसून त्याला शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी तलवारीचा धाक दाखवत अभिजित याला जीवे मारण्याची धमकीदेखील दिली आहे. यानंतर त्या युवकाने प्रेयसीच्या वडिलांच्या धमकीला घाबरून घरातील विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे.

आपल्या मुलाने विष पिल्याचे समजताच अभिजितच्या आई वडिलांनी त्याला तातडीने कोल्हापूरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी त्याच्यावर उपचार चालू असताना अचानक त्याची प्रकृती खालावली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी प्रेयसीच्या वडिलांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून या घटनेचा पुढील तपास करण्यात येत आहे.

Leave a Comment