‘लिव्ह इन’मध्ये राहणाऱ्या तरुणीसोबत विकृत कृत्य; दोन मित्रांसह जंगलात नेलं अन्..

गोंदिया : हॅलो महाराष्ट्र – लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या तरुणीची तिच्याच प्रियकारनं मित्रांच्या मदतीनं हत्या केली आहे. या खुनाचा उलघडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह अन्य दोघांना अटक केली आहे. या आरोपींनी मृत तरुणीला जंगलात नेवून तिची निर्घृण हत्या केली होती. चिचगड पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

23 जून रोजी गोंदिया जिल्ह्याच्या चिचगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ढासगड याठिकाणी एका अज्ञात तरुणीचा मृतदेह सापडला होता. आरोपींनी गळ्यावर, डोक्यावर धारदार शस्त्रानं वार करून तिची हत्या केली होती. पण संबंधित तरुणी नेमकी कोण आणि तिची हत्या कोणी केलं, याच गूढ बनले होते. यानंतर पोलिसांनी मृत तरुणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तरुणीची ओळख पटवली. यानंतर पोलिसांनी तपास करून प्रियकरासह दोन साथीदारांना अटक केली आहे.

समीर असलम शेख असे अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. तर आसिफ शेरखान पठाण आणि प्रफुल पांडुरंग शिवणकर अशी बाकी तरुणांची नावे आहेत. आरोपी समीर हा मागील काही काळापासून मृत तरुणीसोबत लिव्ह इनमध्ये राहत होता. यादरम्यान मृत तरुणीने समीरकडे लग्नाचा तगादा लावला. पण समीरला लग्न करायचे नव्हते. प्रेयसीनं लग्नाचा तगादा लावल्यानं संतापलेल्या समीरनं प्रेयसीचा खून करण्याचे ठरवले. यासाठी त्यानं मित्र आसिफ आणि प्रफुल या दोघांशी संगनमत केलं.यानंतर आरोपी प्रियकरानं फिरण्याच्या बहाण्यानं प्रेयसीला ढासगड येथील जंगलात नेले आणि त्याठिकाणी आरोपीनं आपल्या मित्रांच्या मदतीनं प्रेयसीवर धारदार शस्त्रानं वार करत तिचा खून केला. यानंतर आरोपींनी पुरावा नष्ट करण्यासाठी तरुणीचा मृतदेह जंगलात नेऊन टाकला.

You might also like